Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • महाराष्ट्र
  • धक्कादायक! पारनेरमध्ये कीर्तनकाराकडून अल्पवयीन मुलीवर अमानुष छळ करत अत्याचार, कीर्तनकाराचं घृणास्पद कृत्य उघडकीस
Top News

धक्कादायक! पारनेरमध्ये कीर्तनकाराकडून अल्पवयीन मुलीवर अमानुष छळ करत अत्याचार, कीर्तनकाराचं घृणास्पद कृत्य उघडकीस

Ahilyanagar Crime | सध्या संपूर्ण अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्याला हादरवून सोडणारी घटना समोर आली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर (Parner) तालुक्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. एका नामांकित किर्तनकाराने आणि वारकरी शिक्षण संस्थेच्या अध्यक्षाने 17 वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा अमानुष छळ करत तिच्यावर अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे सध्या नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

हेही वाचा – सर्वात मोठ्या सरकारी रुग्णालयात भीषण आग; आयसीयूमध्येच आगीचा भडका, 10 जणांचा दुर्दैवी मृत्यू

नराधम किर्तनकाराचा खरा चेहरा आला समोर

नराधम किर्तनकाराचा खरा चेहरा आता समोर आला आहे. ढवळपुरी या गावातील श्री दुर्गादेवी वारकरी शिक्षण संस्थेचा अध्यक्ष यशवंत एकनाथ थोरात उर्फ अण्णासाहेब गुंजाळ (किर्तनकार महाराज) एवढ्या दिवस अध्यात्माचा बुरखा पांघरून फिरत होता. मात्र, आता त्याचा नराधमी चेहरा समोर आला असून पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत.

2021 पासून एका 17 वर्षीय मुलीवर नराधम यशवंत थोरातने अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे. आरोपी यशवंत थोरात हा पीडित मुलीच्या घराच्या शेजारीच राहत होता. दोन्ही कुटुंबांमध्ये जवळचे संबंध होते. धक्कादायक बाब म्हणजे पीडित मुलीचा भाऊ हा आरोपी यशवंत थोरातच्या संस्थेत सचिव म्हणून काम करत आहे. तर याच गोष्टीचा फायदा घेत आरोपीची नजर पीडित मुलीवर पडली आणि त्याने 5 वर्षांपासून पीडितेवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

बांबूने बेदम मारहाण करत पीडितेवर करत होता अत्याचार

ज्यावेळी पीडित मुलगी घरी एकटी असायची तेव्हा नराधम यशवंत थोरात हा तिच्या घरी जाऊन तिच्यावर बळजबरी करत अत्याचार करत होता. तर 10 मार्च 2026 राजी आरोपीने पीडित मुलीला फोन करून आपल्या घरी बोलावले. त्यावेळी मुलीने घरी येण्यास नकार दिला, मग आरोपीने पीडितेला तिच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर घाबरलेली मुलगी आरोपीच्या घरी गेली. त्यावेळी त्याने तिला कॉम्प्युटर रूममध्ये नेत तिला बांबूने बेदम मारहाण केली. आरोपी एवढ्यावर थांबला नाही तर त्याने गॅसवर लोखंडी पक्कड गरम करत तिच्या शरीरावर चटके दिले. या अमानुष छळानंतर आरोपीने पीडितेवर बलात्कार केला.

या घटनेनंतर पीडित मुलीने धाडस करत घडलेला सर्व प्रकार घरच्यांना सांगितला. त्यानंतर या घटनेची माहिती पारनेर पोलिसांना देण्यात आली. सध्या पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे. आरोपीवर पोलिसांनी विविध कलमान्वये बलात्कार आणि गंभीर दुखापतीचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर अहिल्यानगर जिल्ह्यातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts