Breaking News :
  • Home
  • लाईफस्टाईल
  • गुढी उभारताना ‘या’ चुका अजिबात करू नका; जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
ताज्या बातम्या

गुढी उभारताना ‘या’ चुका अजिबात करू नका; जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी

gudi padwa

Gudi Padwa 2026 | गुढीपाडवा (Gudi Padwa) हा मराठी नववर्षाचा अत्यंत शुभ सण मानला जातो. या दिवशी घरासमोर गुढी उभारण्याला विशेष धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. गुढीपाडव्याला लोक आपले घर स्वच्छ करतात आणि आपल्या घरासमोर रांगोळी काढत, फुलांनी सजावट करत गुढी उभारली जाते. मात्र गुढी उभारताना बऱ्याच लोकांकडून काही चुका नकळत घडतात. त्यामुळे गुढी उभारताना खालील महत्त्वाच्या गोष्टी नक्की लक्षात ठेवा.

हेही वाचा – BSNL Number Reactivation: आता बंद पडलेला नंबर होईल पुन्हा सुरू, मिळेल 90 दिवसांची वैधता, जाणून घ्या ते कसे

गुढी उभारताना कोणत्या चुका करायच्या नाहीत?

1. जुनी किंवा फाटलेली साडी वापरू नका – जेव्हा तुम्ही गुढी उभारता तेव्हा नेहमी नवीन, स्वच्छ साडी वापरावी. जुनी, फाटलेली, अस्वच्छ किंवा ओटीतील साडी गुढीसाठी कधीही वापरू नये.

2. गुढी उभारताना अशुद्ध काठी वापरू नका – गुढी उभारताना गुढीची काठी अर्धवट किंवा तुटलेली नसावी. तसेच ती काठी स्वच्छ असावी अशुद्ध नसावी. गुढीची काठी बांबूची असावी आणि ती मजबूत, सरळ असावी. तर गुढी उभारताना काठी स्वच्छ धुवून घ्यावी आणि नंतर हळद-कुंकू लावून ती सजवावी आणि गुढी उभारावी.

3. गुढी उभारताना अपूर्ण वस्तू ठेवू नका – गुढी उभारताना सर्व वस्तू असणे गरजेचे असते. त्यामध्ये बांबूची काठी, नवीन साडी, साखरेची गाठी माळ, फुलांचा हार, कडुलिंबाची पाने, तांब्या किंवा कलश या वस्तू गुढी उभारताना असणे गरजेच्या असतात. या वस्तू अपूर्ण ठेऊ नका पूर्ण विधीने गुढी उभी करा यामुळे आपल्याला शुभ फळ मिळते असं मानलं जातं.

4. चुकीच्या दिशेला गुढी उभारू नका – गुढी उभारताना चुकीच्या दिशेला उभारू नका. गुढी पश्चिम किंवा दक्षिण दिशेला उभारू नका. कधीही गुढी घराच्या उजव्या बाजूला किंवा घराच्या मुख्य दारावर उभारावी.

5. गुढी लवकर उतरवू नका – गुढी कधीही लवकर उतरवायची नसते. कधीही घाई न करता गुढीपाडव्या दिवशी परंपरेनुसार गुढी संध्याकाळी किंवा सूर्यास्तापूर्वी उतरवणे योग्य मानले जाते.

यंदा गुढी उभारताना तुम्हीही वरील गोष्टी नक्की लक्षात ठेवा आणि कोणत्याही चुका करू नका. योग्य पद्धतीनेच गुढी उभी करा. गुढीपाडवा हा फक्त सण नसून नव्या सुरुवातीचं, सकारात्मकतेचं आणि विजयाचं प्रतीक मानला जातो. गुढी उभारण्यामागे धार्मिक श्रद्धेसोबतच आरोग्य, आनंद आणि समृद्धीची भावना दडलेली आहे. त्यामुळे गुढी उभारताना परंपरेनुसार योग्य पद्धतीचा अवलंब करणे महत्त्वाचे ठरते. लहान-लहान चुका टाळून श्रद्धा आणि उत्साहाने गुढी उभारली, तर घरात सुख-शांती आणि भरभराट येते, अशी मान्यता आहे. त्यामुळे या गुढीपाडव्याला योग्य पद्धतीने गुढी उभारून नववर्षाची सुरुवात सकारात्मक विचारांनी करा आणि कुटुंबासोबत आनंदाने सण साजरा करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts