Breaking News :
  • Home
  • महाराष्ट्र
  • मनसे मेळाव्यात राज ठाकरे फोडणार डरकाळी; राजकीय रणशिंग फुंकत कोणावर साधणार निशाणा?
Mumbai

मनसे मेळाव्यात राज ठाकरे फोडणार डरकाळी; राजकीय रणशिंग फुंकत कोणावर साधणार निशाणा?

raj thackeray 1

Raj Thackeray MNS Gudi Padwa Melava | आज गुढीपाडव्यानिमित्त (Gudi Padwa) आणि मराठी नववर्षानिमित्त मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) मोठी गर्जना करणार आहेत. त्यामुळे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) पारंपारिक आणि बहुचर्चेत पाडवा मेळाव्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे (Maharashtra) लक्ष लागून राहिले आहे. आज संध्याकाळी शिवतीर्थावर मनसेचा पाडवा मेळावा (MNS Padwa Melava) पार पडणार आहे.

हेही वाचा – गुढीपाडव्याचा जल्लोष सुरू! मुंबई, ठाणे, नागपूरसह राज्यभर शोभायात्रांना सुरुवात

मागील वर्षी हिंदी सक्तीविरोधात दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले होते. तसेच दोन्ही ठाकरे बंधूंनी मिळून मुंबई महापालिका निवडणूक लढवली होती. तर आता पहिल्यांदाचा ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर आजच्या पाडवा मेळ्याव्यात राज ठाकरे नेमका कोणावर निशाणा साधणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सध्या शिवतीर्थावर मनसे पाडवा मेळाव्याची जोरदार तयारी सुरू आहे. आज संध्याकाळी 5 वाजता राज ठाकरेंच्या पाडवा मेळाव्याला सुरूवात होणार आहे. या मेळाव्यासाठी संपूर्ण राज्यभरातून कार्यकर्ते सभेला पोहोचणार आहेत. तसेच मनसेच्या पाडवा मेळ्याव्याचा टीझर मनसेच्या अधिकृत ‘एक्स’ अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे. या टीझरमध्ये, मी महाराष्ट्रावर प्रेम करतो, मराठी भाषेवर प्रेम करतो, मराठी माणसांवर प्रेम करतो आणि टोकाचं प्रेम करतो. तसेच मराठी माणसाच्याबाबतीत, मराठी भाषेच्या बाबतीत आणि महाराष्ट्राबाबती राज ठाकरे कोणाशीही तडजोड करणार नाही, असं दमदार आवाजात म्हणताना राज ठाकरे दिसत आहेत. सध्या हा टिझर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

मनसेच्या पाडवा मेळाव्यात आज उद्धव ठाकरे उपस्थित राहणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच आज राज ठाकरे कोणावर हल्लाबोल करणार आणि कोणत्या मुद्दाला हात घालणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान, आज गुढीपाडव्यानिमित्त मुंबई, नागपूर, पुणे, ठाणे यांसह अनेक भागांमध्ये शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यभरात ठिकठिकाणी शोभा यात्रा काढल्या जात असून उत्साहाचे वातावरण आहे. नागपूरमध्येही गुडीपाडव्यानिमित्त शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. तर या शोभा यात्रेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली आहे. तर दुसरीकडे ठाण्यातही शोभा यात्रा काढण्यात आली असून या शोभा यात्रेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सहभागी झाले आहेत.  तसेच गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असल्यामुळे आज पंढरपूरमध्ये मोठी सजावट करण्यात आली आहे. पंढरपूरमध्ये विठ्ठल रूक्मिणी मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिराला देखील आकर्षक सजावट करण्यात आली असून तिथे परंपरेनुसार गुढीपाडवा साजरा करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts