Breaking News :
  • Home
  • संस्कृती
  • Shardiya Navratri 2026: यंदा कोणत्या वाहनावरून येणार देवी? जाणून घ्या शुभ-अशुभ संकेत
लाईफस्टाईल

Shardiya Navratri 2026: यंदा कोणत्या वाहनावरून येणार देवी? जाणून घ्या शुभ-अशुभ संकेत

Shardiya Navratri 2026
Shardiya Navratri 2026: यंदा शारदीय नवरात्रीला ११ ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. धार्मिक मान्यतेनुसार नवरात्रीच्या सुरुवातीच्या वारावरून देवीच्या आगमनाचे वाहन ठरते. यंदा देवी कोणत्या वाहनावरून येणार आणि त्याचे शुभ-अशुभ संकेत काय मानले जातात? जाणून घेऊया.

Shardiya Navratri 2026: हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र मानला जाणारा शारदीय नवरात्री उत्सव यंदा ११ ऑक्टोबर २०२६ पासून सुरू होणार आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवी दुर्गेच्या विविध रूपांची भक्तिभावाने पूजा केली जाते. देशभरातील मंदिरांमध्ये आणि घराघरांत घटस्थापना करून या उत्सवाला सुरुवात केली जाते.

नवरात्रीशी (Navratri 2026) संबंधित अनेक धार्मिक परंपरा आणि मान्यता प्रचलित आहेत. त्यापैकी एक महत्वाची मान्यता म्हणजे देवी दुर्गेचे आगमन आणि प्रस्थान कोणत्या वाहनावरून (Navratri Devi Vahan) होते, यावरून वर्षातील काही शुभ- अशुभ संकेत पाहिले जातात. देवी काही हत्तीवर (Navratri Elephant Vahan) , कधी घोड्यावर (Devi Durga Vehicle 2026) तर कधी पालखी किंवा इतर वाहनावरून येते, अशी धार्मिक मान्यता आहे. यंदा देवीचे आगमन आणि प्रस्थान कोणत्या वाहनावरून होणार? त्यामागे कोणती मान्यता आहे? जाणून घेऊया.

हेही वाचा: Petrol Diesel Price Today: पेट्रोल-डिझेल भरण्यापूर्वी पाहा आजचे दर; महाराष्ट्रातील शहरनिहाय भाव

यंदा कोणत्या वाहनावरून येणार देवी दुर्गा?

धार्मिक मान्यतेनुसार नवरात्रीच्या सुरुवातीचा वार पाहून देवीच्या आगमनाचे वाहन ठरवले जाते. रविवार आणि सोमवार या दिवशी नवरात्रीची सुरुवात झाल्यास देवीचे वाहन हत्ती मानले जाते. LS Marathi News Channel

यंदा शारदीय नवरात्रीची सुरुवात रविवार, ११ ऑक्टोबर २०२६ रोजी होत आहे. त्यामुळे प्रचलित धार्मिक मान्यतेनुसार यंदा देवी दुर्गेचे आगमन हत्तीवरून (Elephant Vehicle Navratri) होणार आहे.

हत्तीवरून देवीचे आगमन शुभ का मानले जाते?

धार्मिक परंपरेमध्ये हत्तीला समृद्धी, स्थैर्य, ऐश्वर्य आणि शांततेचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे देवी दुर्गेचे हत्तीवरून आगमन हे शुभ आणि सकारात्मक संकेत मानले जाते.

अनेक धार्मिक मान्यतांनुसार, देवीचे हत्तीवर आगमन झाल्यास घरात सुख-समृद्धी वाढणे, आनंदाचे वातावरण निर्माण होणे आणि भक्तांवर देवीची कृपादृष्टी राहणे असे संकेत मानले जातात.

मात्र, हे सर्व धार्मिक श्रद्धा आणि पारंपरिक मान्यता आहेत. याला वैज्ञानिक आधार असल्याचे सिद्ध झालेले नाही.

देवीचे प्रस्थान कोणत्या वाहनावरून होणार?

ज्याप्रमाणे देवीच्या आगमनासाठी वारानुसार वाहन मानले जाते, त्याचप्रमाणे नवरात्रीच्या समाप्तीच्या वारानुसार देवीच्या प्रस्थानाचे वाहन ठरवण्याचीही परंपरा आहे.

यंदा नवरात्रीची सांगता मंगळवारी होत असल्याने प्रचलित मान्यतेनुसार देवीचे प्रस्थान पायी होणार असल्याचे मानले जाते.

हेही वाचा: नाना पाटेकरांनी पहाटे २.३० वाजता मित्राला केला होता मेसेज; काही तासांतच निधन, डॉक्टरांनी सांगितलं नेमकं काय घडलं?

देवीचे पायी प्रस्थान काय दर्शवते?

धार्मिक मान्यतेनुसार देवीचे पायी प्रस्थान काहीसे चिंताजनक संकेत मानले जाते. अशा वेळी सामाजिक किंवा नैसर्गिक परिस्थितीत काही आव्हाने निर्माण होण्याची शक्यता असल्याचे पारंपरिक ज्योतिषीय मत आहे.

काही मान्यतांमध्ये पायी प्रस्थानाचा संबंध रोगराई, दुःख, नैसर्गिक संकटे किंवा सामाजिक अस्थिरता यांसारख्या घटनांशी जोडला जातो. तसेच सत्ताकारणात बदल किंवा उलथापालथ होण्याचे संकेतही काही ठिकाणी दिले जातात.

मात्र, हे केवळ धार्मिक आणि ज्योतिषीय समज आहेत. भविष्यातील घटना निश्चितपणे अशाच घडतील, असे त्यावरून म्हणता येत नाही.

नवरात्रीत देवीच्या वाहनाला एवढे महत्त्व का?

नवरात्रीच्या काळात देवी दुर्गा पृथ्वीवर येत आहे भक्तांना आशीर्वाद देते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. त्यामुळे देवीच्या आगमनाचे वाहन हा भक्तांसाठी उत्सुकतेचा विषय असतो.

नऊ दिवस देवीची आराधना, उपवास घटस्थापना, गरबा – दांडिया आणि विविध धार्मिक कार्यक्रमांद्वारे नवरात्री साजरी केली जाते. भक्त देवीकडे सुख, आरोग्य, समृद्धी आणि कुटूंबाच्या कल्याणासाठी प्रार्थना करतात. यंदा हत्तीवरून होणारे देवीचे आगमन शुभ मानले जात असून, मंगळवारी होणारे पायी प्रस्थान मात्र पारंपरिक मान्यतेनुसार वेगळे संकेत देणारे मानले जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts