Top News

मंगळसूत्रात काळे मणी का असतात ? जाणून घ्या किती असते मंगळसूत्रात ताकत

mangalsutra black beads

Why mangalsutra has black beads : आपल्या हिंदू संस्कृतीत काळा रंग हा अशुभ मानला जातो. भारतीय संस्कृतीत प्रतेक रंगांना महत्वपूर्ण स्थान आहे. आणि प्रत्येक रंग काही न काही संदेश देतो. जसे की पांढरा रंग हा शांततेचे प्रतीक आहे. तर लाल रंग मंगलकार्याचा आणि पिवळा रंग सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. आणि काळा रंग बऱ्याचदा अशुभ मानला जातो. लग्नसाराईत काळा रंग वगळला जातो. परंतु विवाह करताना मंगळसूत्रात काळे मनीच वापरले जातात. असे का ? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. एक विवाहित स्त्रीच्या गळ्यात असलेल्या मंगळसूत्रातील काळे मनी अत्यंत शुभ असतात. या मागे काय लॉजिक असेल हे आपण आज या लेखात जाणून घेणार आहोत. त्यापूर्वी जाणून घेऊया मंगळसूत्राचा प्राचीन इतिहास

काय आहे इतिहास

मंगळसूत्र हा फक्त एक दागिना किंवा शोभेची वस्तु नसून विवाहाचे पवित्र प्रतीक आहे. यापूर्वी मंगळसूत्र बांधण्याची पद्धत दक्षिण भारतात होती. मंगल्या सूत्रम या प्रथेपासूनच संपूर्ण भारतात मंगळसूत्र विवाहित महिलांचे पवित्र प्रतीक बनले. काळे आणि सोन्याचे मनी एक धाग्यात एकत्र गुंफून बनवलेले एक सूत्र म्हणजेच सौभाग्याचे लेणं म्हणजेच मंगळसूत्र. विवाहित महिलेच्या गळ्यातील एक सूत्र म्हणजे तिच्या आयुष्यातील सहजिवणाची, नात्याची आणि संरक्षनाची प्रतिज्ञा आहे. या मंगळसूत्रातील प्रत्येक मणी आणि धागा एक वेगळी कथा सांगते.

काळा रंग- नजरेपासून बचाव

भारतीय संस्कृतीत आणि परंपरेनुसार काळा रंग दृष्ट  टाळण्यास फायदेशीर आहे. यामुळे वाईट नजरेपासून बचाव होतो. बऱ्याचदा शरीरातील गोंदणात काळ्या डॉटचा समावेश केला जातो. लहान बाळाच्या चेहऱ्यावर देखील काळा डॉट लावला जातो. जेणेकरून नजर लागणार नाही. मंगळसूत्रात असलेले काळे मणी देखील हेच कार्य करतात. तिच्या सुख समाधानासाठी, आरोग्यासाठी आणि नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी काळे मणी हे संरक्षण कवच म्हणून काम करतात. म्हणूनच काळा रंग हे अशुभ नसून शुभ संरक्षण करणारा असल्याचे मानतात.

हे ही वाचा : अक्रोड भिजवून खाल्ल्यास होतील ‘हे’ फायदे

वैज्ञानिक दृष्टिकोनानुसार, काळा रंग उष्णता आणि नाजुक ऊर्जा शोषून घेतो. पूर्वीच्या काळी काळे मनी हे शरीरातील ऊर्जा शोषून घेऊन स्त्रियांना मानसिक आणि शारीरिक संरक्षण मिळते असे मानले जात असे. तज्ञाच्या मते काळे मणी हे ब्लड सर्क्युलेशन सुधारण्यास मदत करतात. एवढेच नाही तर शरीरातील ऊर्जा संतुलित ठेवण्यास मदत होते. मंगळसूञाच्या घर्षणामूळे अकयूप्रेशर पॉईंट्स सक्रिय होतात. याशिवाय शारीरिक आणि मानसिक स्थैर्य मिळते. म्हणून पूर्वी महिलांसाठी मंगळसूत्र परिधान करणे हे आरोग्यदायी मानले जात असे.

काळा रंग संरक्षणाचं प्रतीक

मंगळसूत्रातील सोनं हे समृद्धीचं प्रतीक तर काळा रंग संरक्षणाचं प्रतीक आहे. या दोन्हींचा संगम म्हणजे सौभाग्याची पूर्णता आहे. सोने हे सकारात्मक ऊर्जा, उन्नती, समृद्धी देते. तर काळे मणी संरक्षण, स्थैर्य, संतुलन. दोन्ही मिळून एका महिलेच्या आयुष्याचा संपूर्ण अर्थ व्यक्त होतो. सोन्याच्या मंगळसूत्रामध्ये असलेले काळे मणी नकारात्मक लहरी शोषून घेतो, ज्यामुळे लग्नातील कोणतेही संकट व नुकसानीपासून संरक्षण होण्यास मदत होते. एवढेच नाही तर मंगळसूत्रातील काळे मणी शनि ग्रहाचे प्रतीक मानले जातात. हे मणी पती-पत्नीवरील शनीच्या अडथळ्यांना स्वतःवर घेतात,
ज्यामुळे पतीच्या जीवनात आनंद राहतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts