Breaking News :
  • Home
  • महाराष्ट्र
  • अलिशान लॅम्बोर्गिनीचा अपघात; मुंबईतील कोस्टल रोडवर डिव्हायडरला कार धडकली
Mumbai

अलिशान लॅम्बोर्गिनीचा अपघात; मुंबईतील कोस्टल रोडवर डिव्हायडरला कार धडकली

mh mum 7212052 coastalroadamborghinicaraccident 22092025135630 2209f 1758529590 507 2

मुंबई : मु्ंबईकरांना वाहतूक कोंडीतून सुटका मिळण्यासाठी मुंबईच्या सागरी किनारी कोस्टल रोडची निर्मिती करण्यात आली. कोस्टल रोडमुळं वेळेची बचत आणि जलदगतीने प्रवास होतो, असं बोललं जातं. याच कोस्टल रोडचे बिग बी अभिताभ बच्चन यांनीही कौतुक केलं होतं. दरम्यान, याच कोस्टल रोडबाबत एक अपघाताची बातमी समोर आली आहे. ही घटना गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजता घडली आहे. कोस्टल रोडवर भरधाव वेगात असलेल्या लॅम्बोर्गिनी कारचा भीषण झाल्याची घटना घडली आहे. या अपघाताचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

उद्योगपती गौतम सिंघानियाकडून व्हिडीओ शेअर :

दरम्यान, या अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर उद्योगपती गौतम सिंघानिया यांनी शेअर केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार कुलाबाच्या दिशेने जाणाऱ्या लॅम्बोर्गिना या अलिशान कारवरील चालकाचे नियंत्रण सुटलं. त्यामुळं ही कार दुभाजकावर जाऊन धडकली. या अपघातात कारचालकाला कोणतीही इजा झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. तसेच या अपघातात कारचा समोरील काही भाग खिळखिळा झाला आहे. तसेच लॅम्बोर्गिनी या अलिशान कारच्या अपघाताबाबत रेमंड लिमिटेड ग्रुपचे अध्यक्ष गौतम सिंघानिया यांनी चिंता व्यक्त केली आहे.

अतिश शाह हे लॅम्बोर्गिनी कारचे चालक :

दुसरीकडं या अपघातानंतर कारला टो करण्यात आले आहे. कारच्या बोनटचे प्रचंड नुकसान झाले आहे. वरळी पोलिसांनी आरटीओ कार्यालयाकडून कारची तपासणी होणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं. तसेच मुंबईतील उच्चभ्रू नेपियन सी रोड या विभागातील राहणारे अतिश शाह हे लॅम्बोर्गिनी कार चालवत होते. शाह यांची कारवरील नियंत्रण सुटल्यानं अपघात झाला. या प्रकरणी वरळी पोलिसांनी अतिश शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलीस वरळी पोलीस स्टेशनचे पोलीस उपायुक्त कृष्णकांत उपाध्ये यांना विचारले असता, “मी सध्या बैठकीत आहे. थोड्या वेळानं फोन करा,” असं त्यांनी सांगितलं.

ताब्यातील कार निष्काळजीपणे आणि बेदारकरपणे चालवून स्वतःच्या तसेच इतरांचे जीविताला धोकात निर्माण होईल, अशा प्रकारे चालवण्याची कृती केली. तसेच स्वतःच्या कारचे नुकसान करण्यास कारणीभूत झाल्यानं शाह यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts