Maharashtra Heatwave Alert: राज्यात सध्या हवामानाचे दुहेरी स्वरूप दिसत असून प्रशासनाने हाय अलर्ट जारी केला आहे. पुढील ७ तास नागरिकांसाठी धोक्याचे मानले जात आहे.
राज्यात सध्या हवामानाचे दुहेरी स्वरूप दिसत असून प्रशासनाने हाय अलर्ट जारी केला आहे. पुढील ७ तास नागरिकांसाठी धोक्याचे मानले जात आहे. आज, २८ एप्रिल २०२६ रोजीच्या अंदाजानुसार, भारतीय विभागाने राज्यात तीव्र उष्णतेचा इशारा दिला आहे. विदर्भ, मराठवाडा आणि कोकण या भागांत उष्णतेची लाट अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.
गेल्या काही दिवसांत हवामानात मोठे चढ- उतार पाहायला मिळाले. काही भागांत पाऊस पडला, तर काही ठिकाणी कडक उन्हाचा तडाखा बसत आहे. या बदलत्या परिस्थितीत काही जिल्ह्यांमध्ये आजही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र, एकूणच एकूणच एप्रिल महिन्यात तापमान प्रचंड वाढले असून काही शहरांमध्ये ते 46 अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. यवतमाळ, अमरावती आणि वर्धा येथे तापमान सुमारे 47 अंशांपर्यंत पोहोचले आहे.
हेही वाचा: पुण्याजवळ वंदे भारत एक्सप्रेसचा एक डबा रुळावरुन घसरला; सुदैवानं जीवितहानी नाही
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नागरिकांनी दुपारी 12 ते 4 या वेळेत घराबाहेर पडणे टाळावे. प्रशासनाकडूनही सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अकोला येथे उष्णतेची लाट विशेषतः तीव्र असून तापमान 46.9 अंशांवर पोहोचले आहे, जे मागील काही वर्षांतील उच्चांक मानले जात आहे. उष्णतेची तीव्रता इतकी वाढली आहे की काही ठिकाणी लोकांनी गरम जमिनीवरच अन्न शिजवून दाखवले.
पुढील दोन ते तीन दिवस तापमानात फारशी घट होण्याची शक्यता नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक कामांशिवाय बाहेर जाणे टाळावे. नाशिकमध्येही उष्णतेचा प्रभाव वाढलेला असून दुपारच्या वेळी रस्त्यांवर गर्दी कमी दिसून येत आहे.
उष्णतेची लाट
राज्यातील अनेक भागांमध्ये उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज आहे. देशातील सर्वाधिक उष्ण शहरांमध्ये अमरावती आणि अकोल्याचा समावेश झाला आहे. यापूर्वी झालेल्या पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीनंतर आता वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांना अधिक त्रास सहन करावा लागत आहे.
आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन
प्रशासनाने नागरिकांना जास्तीत जास्त पाणी पिण्याचे आणि आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. वाशिम जिल्ह्यातही तापमान 44 अंशांच्या वर कायम असून उष्णतेचा प्रचंड परिणाम जाणवत आहे. त्यामुळे सर्वांनी सावध राहून योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे.










