बस्तर : छत्तीसगडमधील बस्तर इथं नक्षलवाद्यांची सर्वात मोठी शरणागती झाली. आज 208 नक्षलवाद्यांनी एकाचवेळी आत्मसमर्पण केलं आणि शस्त्रं टाकली. आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलवाद्यांमध्ये वरिष्ठ नेत्यांचा समावेश होता. राज्य सरकारनं त्यांच्या “नक्षल निर्मूलन धोरण” अंतर्गत आतापर्यंतचा सर्वात मोठा शरणागती कार्यक्रम आयोजित केला. यावेळी मुख्यमंत्री विष्णुदेव साई म्हणाले, “आजचा दिवस केवळ छत्तीसगडसाठीच नाही तर संपूर्ण देशासाठी एक ऐतिहासिक दिवस आहे, कारण इतक्या मोठ्या संख्येनं नक्षलवादी हिंसाचार सोडून संविधान आणि विकासाच्या मार्गावर परतत आहेत.”
208 नक्षलवाद्यांनी पत्करली शरणागती :
शुक्रवारी नक्षलग्रस्त बस्तर विभागात हे ऐतिहासिक दृश्य पाहायला मिळालं. रिझर्व्ह पोलीस लाईन्स इथं आयोजित समारंभात सुमारे 208 नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करली. या नक्षलवाद्यांकडून एकूण 153 शस्त्रं जप्त करण्यात आली, ज्यात AK-47, SLR, INSAS रायफल, LMG, 303 रायफल, कार्बाइन, पिस्तूल आणि BGL लाँचर्स यांचा समावेश आहे. शरणागतीपूर्वी नक्षलवाद्यांनी परेड आयोजित केली आणि संविधानाच्या प्रती हातात धरल्याचं दिसून आलं. मुख्य समारंभात नक्षलवाद्यांनी हातात संविधान धरलं होतं. आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांमध्ये 110 महिला आणि 98 पुरुष नक्षलवाद्यांचा समावेश आहे.
#WATCH | Jagdalpur, Chhattisgarh | A total of 208 Naxalites brought to police lines to surrender along with 153 weapons and undergo rehabilitation. With this, most of Abujhmad will be freed from Naxal influence, and the Red terror will come to an end in North Bastar. Now, only… pic.twitter.com/7HpVhjU29s
— ANI (@ANI) October 17, 2025
ऐतिहासिक दिवस :
मुख्यमंत्री विष्णुदेव साई यांनी या प्रसंगाचं वर्णन ऐतिहासिक आणि निर्णायक दिवस म्हणून केले. ते म्हणाले, “हा केवळ छत्तीसगडसाठीच नाही तर संपूर्ण देशासाठी अभिमानाचा क्षण आहे, कारण मोठ्या संख्येनं नक्षलवादी बंदुकीऐवजी संविधान हाती घेत आहेत. सरकार त्यांना कौशल्य विकास आणि पुनर्वसनाच्या संधी उपलब्ध करुन देईल जेणेकरून ते सन्माननीय जीवन जगू शकतील.”
नक्षलवाद्यांचा कॅडर प्रोफाइल काय :
CCM – 1
DKSZC – 4
प्रादेशिक समिती सदस्य – 1
DVCM – 21
ACM – 61
पक्ष सदस्य – 98
PLGA/RPC/इतर – 22
शस्त्रं सोडून संविधान हातात :
आज्ञाधारक नक्षलवाद्यांचं अबुझमद परिसरातून जगदलपूर इथं आगमन झाले. समारंभात, या नक्षलवाद्यांनी पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांसमोर हातात भारतीय संविधान धरुन हिंसाचाराचा त्याग करण्याची शपथ घेतली. त्यांच्या पुनर्वसनाचा भाग म्हणून त्यांना कौशल्य प्रशिक्षण आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन दिल्या जातील असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.