Breaking News :
  • Home
  • महाराष्ट्र
  • नॉन एसी लोकल ट्रेनच्या स्वयंचलित दरवाजांची चाचणी यशस्वी, मुंबईतील नोकरदार वर्गाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्वपूर्ण बातमी
Mumbai

नॉन एसी लोकल ट्रेनच्या स्वयंचलित दरवाजांची चाचणी यशस्वी, मुंबईतील नोकरदार वर्गाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्वपूर्ण बातमी

आजपासून महिला विश्वचषकाचा थरार भारताचा पहिला सामना श्रीलंकेविरुद्ध 4

मुंबई : गेल्या काही महिन्यापूर्वी मुंब्रा येथे लोकल ट्रेन अपघात घडला होता. या भीषण अपघातामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. यावर आता तोडगा निघाला आहे. कारण नॉन एसी लोकल ट्रेनला स्वयंचलित दरवाजा बसवण्याचा प्रयोग यशस्वी झाला आहे. हे लोकल ट्रेन ने प्रवास करणाऱ्या नोकरदार वर्गाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने मोठी आणि महत्वपूर्ण बातमी आहे.

मयंक के. मेहता यांनी दिलेल्या अहवालानुसार, मुंब्रा येथील लोकल ट्रेनमध्ये स्वयंचलित दरवाजे बसवण्याचा प्रयोग यशस्वी झाला आहे. तसेच रेल्वे प्रशासनाने या नवीन प्रणालीची चाचणी घेतली असून या चाचणीवेळी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्म वीर मीना यांची उपस्थिती होती.

या नॉन-एसी लोकल ट्रेन मध्ये बसवण्यात आलेले स्वयंचलित दरवाजे एसी लोकल ट्रेनच्या दरवाजांसारखेच आहे. तर महिलांच्या एका डब्यात बसवण्यात आलेल्या या दरवाज्याला हवा खेळती रहावी यासाठी जाळ्या आणि फ्लॅप्स बसवण्यात आले आहेत. यामुळे पावसाचे पाणी आत येऊ शकणार नाही. याची खास करून काळजी घेण्यात आली आहे.

रेल्वे अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बसविण्यात आलेलं स्वयंचलित दरवाजे हे 10 सेकंदाच्या आत आपोआप उघडतील आणि बंद होती. लोकल ट्रेन सुरू असताना किंवा थांबणार असेल तेव्हा दरवाज्यांच्या हालचालींवेळी अलार्म सिस्टीम कार्यरत असणार आहे, ज्यामुळे प्रवाशांना वेळेवर सूचना मिळती. डिसेंबरपर्यंत मुंबईतील सर्व नॉन-एसी लोकल ट्रेनमध्ये स्वयंचलित दरवाजे बसवणे हे या प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट आहे.

मुंब्रा येथे लोकल ट्रेनच्या अपघातानंतर प्रवाशांच्या सुरक्षेबाबतचा प्रश्न ऐरणीवर आला होता. त्यानंतर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी लोकल ट्रेनला स्वयंचलित दरवाजा बसवण्यात येणार असल्याची चर्चा सुरु होती. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत रेल्वेसोबत चर्चा सुरु असल्याची माहिती दिली होती. आता हा प्रयोग यशस्वी होऊन स्वयंचलित दरवाजा असलेल्या नॉन एसी लोकल ट्रेनची चाचणी घेण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts