• Home
  • महाराष्ट्र
  • मुंबईकरांना लास्ट माइल कनेक्टिव्हिटी देण्यासाठी सुरु होणार पॉड टॅक्सी
Mumbai

मुंबईकरांना लास्ट माइल कनेक्टिव्हिटी देण्यासाठी सुरु होणार पॉड टॅक्सी

मुंबई शहरात वाढत्या रहदारीमुळे शहराचा विस्तार होताना दिसतोय. यामुळे प्रचंड वाहतूक कोंडीचा सामाना नागरिकांना करावा लागतो. तसेच खास करून पावसाळ्यात नोकरदार वर्ग, बारा बलुतेदार वर्गाला प्रवास करताना प्रचंड हाल होतात. त्यानुषंगाने आता मुंबई करांसाठी पॉड टॅक्सी सेवा सुरु होणार आहे.

मुंबई शहराच्या विस्ताराचा विचार करून प्रवास करताना नागरिकांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी आणि सार्वजनिक परिवहन व्यवस्थेच्या बळकटीकरणासह लास्ट माइल कनेक्टिव्हिटी देण्यासाठी लवकरच ‘पॉड टॅक्सी’ नागरिकांसाठी सुरु करावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्देश दिले आहे. सह्याद्री अतिथीगृह याठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते.

यासह पॉड टॅक्सीचे व्यावसायिक महत्व लक्षात घेऊन जागतिक दर्जाची सर्व्हिस राहण्यासाठी काळजी घेण्यात यावी. अशा सूचना देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यात. या बैठकीला  मुंबई पोलिस आयुक्त देवेन भारती, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त संजय मुखर्जी, अपर मुख्य सचिव संजय सेठी, अपर मुख्य सचिव असीम कुमार गुप्ता, प्रधान सचिव अनुप कुमार सिंग आदी उपस्थित होते. महानगर आयुक्त संजय मुखर्जी आणि पोलिस आयुक्त भारती यांनी सादरीकरण केले.

नागरिकांना विनाविलंब आणि सहजरित्या परिवहन सेवा मिळण्यासाठी पॉड टॅक्सी पर्याय ठरेल

कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानकादरम्यान असलेल्या ‘बिझनेस डिस्ट्रिक्ट’ मध्ये ही सेवा महत्त्वाची ठरेल. तसेच भविष्यात होणारे बुलेट ट्रेन स्टेशन, मुंबई उच्च न्यायालय यामुळे या भागातील नागरिकांची वर्दळ वाढणार आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या परिवहन सेवेवर यामुळे ताण येत असून नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागण्याची दाट शक्यता आहे. भविष्यात या भागात नागरिकांना विनाविलंब आणि सहजरित्या परिवहन सेवा मिळण्यासाठी पॉड टॅक्सी पर्याय ठरेल. असे यावेळी बोलताना ते म्हणाले.

वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स भागातील इमारती या पॉड टॅक्सीने स्टेशनला जोडण्यात याव्यात

मुंबईमध्ये सर्व परिवहन सेवांमध्ये सिंगल कार्डच्या माध्यमातून प्रवास करता यावी व्यवस्था निर्माण करण्यात येणार असून याच सिंगल कार्डद्वारे पॉड टॅक्सीची  सेवा देखील नागरिकांना घेता आली पाहिजे, याच दृष्टीने कार्यवाही करण्यात यावी. पॉड टॅक्सीच्या अनुषंगाने कुर्ला आणि वांद्रे स्थानक परिसराचा विकास करण्यात येऊन कुर्ला स्थानक परिसरात असलेल्या पोलिस निवासाच्या जागेऐवजी पोलिसांना त्याच भागात जागा उपलब्ध करून द्यावी. यासह वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स भागातील इमारती या पॉड टॅक्सीने स्टेशनला जोडण्यात याव्यात, असेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts