Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • मनोरंजन
  • कोण कोणावर भारी? 120 बहादूर, मस्ती 4 आणि विलायत बुद्ध प्रदर्शित; पहिल्या दिवशी केली एवढी कमाई
मनोरंजन

कोण कोणावर भारी? 120 बहादूर, मस्ती 4 आणि विलायत बुद्ध प्रदर्शित; पहिल्या दिवशी केली एवढी कमाई

Posters of 120 Bahadur, Masti 4 and Vilayat Buddha showing box office collection highlights

First day collection of 120 Bahadur Masti 4 Vilayat Buddha : काल म्हणजेच 21 नोव्हेंबर या दिवशी बरेच चित्रपट आणि वेब सिरिज प्रदर्शित करण्यात आल्या होत्या. त्यापैकी काहीनी बॉक्स ऑफिसवर अप्रतिम कमाई केली आहे तर काहीनी 5 कोटी पेक्षा जास्त कमाई पण केलेली नाही. त्यापैकीच दोन चित्रपट मस्ती 4 आणि 120 बहादूर हा चित्रपट देखील काल प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटाने जास्त कमाई केली नसल्याची माहिती समोर आली आहे.

फरहान अख्तर यांची 120 बहादूर आणि आफताब शिवदसानी, विवेक ओबेरॉय, रितेश देशमुख यांची मस्ती 4 हे चित्रपट काल प्रदर्शित करण्यात आले. परंतु मस्ती 4 या चित्रपटाने हवी तेवढी कमाई केली नाही. 120 बहधुर या चित्रपटाने देखील जास्त कमाई केली नसल्याचे समोर आले आहे. तर साऊथ च्या काल रिलीज झालेल्या चित्रपटापैकी विलायत बुद्ध या चित्रपटाने पहिल्या दिवशी 1.65 करोंड रुपयांची कमाई केल्याची माहिती saknilk च्या website वर मिळाली आहे. (First day collection)

Salknilk वेबसाइट वर मिळालेल्या माहितीनुसार, विलायत बुद्ध (Vilayat Buddha) या चित्रपटाने पहिल्या दिवशी 1.65 करोड रुपयांची कमाई करत सुरुवात केली आहे. या चित्रपटाचा बजेट 20 करोंड होता. पहिल्या दिवशी एवढी कमाई केल्याने हा चित्रपट आणखी कमाई करू शकेल का अशी असा सवाल उपस्थित होत आहे.

हे ही वाचा : The Family Man Season 3 ‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज; जाणून घ्या ही वेब सिरिज पहावी की नाही ?

पहिल्याच दिवशी 120 बहादूर आणि मस्ती 4 ने केली एवढी कमाई

बॉक्स ऑफिसवर 120 बहादूर ( 120 Bahadur) या चित्रपटाने 2.35 कोटी रूपयांची कमाई केली आहे. या चित्रपटाचे बजेट 85 कोटी असल्याचे सांगितले जात आहे. तर मस्ती 4या विनोदी चित्रपटाने 2.5 कोटी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटाचे बजेट 50 दशलक्ष होते. शनिवार रविवारी या चित्रपट पाहण्यासाठी चाहते प्रचंड गर्दी करू शकतात. यामुळे हा चित्रपट 20 कोटी पेक्षा जास्त पैसे कमवू  शकतो अशी अपेक्षा आहे.

हे कलाकार आहे मुख्य भूमिकेत

मस्ती 4 (Masti 4) या चित्रपटात रितेश देशमुख , विवेक ओबेरॉय आणि आफताब शिवदासानी यांच्या प्रमुख भूमिका आहे. तर रूही सिंग, श्रेया शर्मा, एलनाज नौरोजी, नतालिया जानोसजेक, शाद रंधावा आणि निशांत सिंग मलकानी यांच्यासोबत अरशद वारसी, तुषार कपूर आणि नरगिस फाखरी या कलाकारांनी देखील या चित्रपटात भूमिका साकारली आहे.

हा चित्रपट कोणी पाहू नये

हा चित्रपट कसा आहे ? चित्रपट पाहाव की नाही ? पैसा वसूल आहे का असे अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतील.हा विनोदी चित्रपट असून ज्या प्रेक्षकांना  डबल मीनिंग जोक ऐकून मजा येते.ज्यांना हलकी कॉमेडी आवडते ते हा चित्रपट नक्कीच सिनेमगृहात जाऊन पाहू शकतात. परंतु जर तुम्हाल पांचट कॉमेडी आवडत नसेल डबल मीनिंग जोक आवडत नसेल तर तुम्ही हा चित्रपट पाहू नका. हा प्रचंड विनोदी चित्रपट असून या चित्रपटातील डायलॉग आणि दोन अर्थी सीन्स तुम्हाला हसवल्याशिवाय राहणार नाही.

img

मी वेबसाईट साठी प्रभावी लिखाण करते. यासह अँकरिंगच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधण्याची आवड आहे. क्रिएटिव्ह कंटेन्ट लिहिणे, कार्यक्रमाचे निवेदन करणे ही माझी आवड असून मी पत्रकारिता आणि जनसंवाद या विषयात पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts