Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • क्रीडा
  • भारताला मिळाला 38वा कसोटी कर्णधार; वाचा आतापर्यंतच्या कर्णधारांची यादी
Top News

भारताला मिळाला 38वा कसोटी कर्णधार; वाचा आतापर्यंतच्या कर्णधारांची यादी

India’s new Test captain standing on the cricket field

गुवाहाटी : भारत आणि दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघात खेळल्या जाणाऱ्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात ऋषभ पंत भारतीय संघाचं नेतृत्व करत आहे. शुभमन गिलच्या अनुपस्थितीत ऋषभ पंतला कर्णधारपद देण्यात आलं आहे. 22 नोव्हेंबर रोजी भारतीय संघासाठी टॉस करताना पंत कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघाचं नेतृत्व करणारा 38 वा कर्णधार बनला. शुभमन गिल मानेच्या दुखापतीमुळं या सामन्यातून बाहेर पडला आहे.

गिलच्या मानेला दुखापत :

बीसीसीआयनं शुक्रवारी दुपारी जाहीर केले की पहिल्या कसोटीदरम्यान मानेच्या दुखापतीमुळं गुवाहाटी इथं दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतून टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिलला बाहेर काढण्यात आलं आहे. पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी फलंदाजी करताना गिलला दुखापत झाली. भारताच्या पहिल्या डावात त्यानं फक्त तीन चेंडू खेळले आणि नंतर वेदनांमुळं तो निवृत्त झाला. त्यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आलं आणि डॉक्टरांच्या देखरेखीखाली दुसऱ्या दिवशी त्याला डिस्चार्ज देण्यात आला. तो 19 नोव्हेंबर रोजी गुवाहाटी इथंही पोहोचला, परंतु दुखापतीमुळं त्यानं कोणत्याही सराव सत्रात भाग घेतला नाही आणि अखेर त्याला सामन्यातून बाहेर काढण्यात आले.

भारताचा 38 वा कसोटी कर्णधार :

शुभमन गिलच्या अनुपस्थितीत, ऋषभ पंत आता संघाचं नेतृत्व करत आहे आणि तो भारताचा 38वा कसोटी कर्णधार बनला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर पंत संघाचं नेतृत्व करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी, 2022 मध्ये, त्यानं पाच टी-20 सामन्यांमध्ये भारताचं नेतृत्व केलं होतं, ज्यामध्ये दोन जिंकले, दोन गमावले आणि एक अनिर्णित राहिला.

आतापर्यंचे भारताचे कसोटी कर्णधार :

1. सीके नायडू (1932-1934) – सामने 4
2. विजयनगरमचे महाराजकुमार (1936-1936) – 3
3. आईएके पटौडी (1946-1946) – 3
4. लाला अमरनाथ (1947-1952) – 15
5. विजय हजारे (1951-1953) – 14
6. वीनू मंकड (1955-1959) – 6
7. गुलाम अहमद (1955-1959) – 3
8. पॉली उमरीगर (1955-1958) – 8
9. हेमू अधिकारी (1959-1959) – 1
10. दत्ता गायकवाड़ (1959-1959) – 4
11. पंकज रॉय (1959-1959) – 1
12. जीएस रामचंद (1959-1960) – 5
13. नारी कांट्रेक्टर (1960-1962) – 12
14. एमआईएके पतौडी (1962-1975) – 40
15. चंदू बोर्डे (1967-1967) – 1
16. अजीत वाडेकर (1971-1974) – 16
17. एस वेंकटराघवन (1974-1979) – 5
18. सुनील गावस्कर (1976-1985) – 47
19. बिशन बेदी (1976-1978) – 22
20. गुंडप्पा विश्वनाथ (1980-1980) – 2
21. कपिल देव (1983-1987) – 34
22. दिलीप वेंगसरकर (1987-1989) – 10
23. रवि शास्त्री (1988-1988) – 1
24. के श्रीकांत (1989-1989) – 4
25. मोहम्मद अजहरुद्दीन (1990-1999) – 47
26. सचिन तेंदुलकर (1996-2000) – 25
27. सौरव गांगुली (2000-2005) – 49
28. राहुल द्रविड (2003-2007) – 25
29. वीरेंद्र सहवाग (2005-2012) – 4
30. अनिल कुंबले (2007-2008) – 14
31. एमएस धोनी (2008-2014) – 60
32. विराट कोहली (2014-2022) – 68
33. अजिंक्य रहाणे (2017-2021) – 6
34. केएल राहुल (2022-2022) – 3
35. रोहित शर्मा (2022-2024) – 24
36. जसप्रीत बुमराह (2022-2025) – 3
37. शुभमन गिल (2025*) – 8
38. ऋषभ पंत (2025*) – 1

 

ऋषभ पंतचा मोठा विक्रम :

कर्णधारपदाची सूत्रं हाती घेतल्यानंतर ऋषभ पंतनं एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये भारताचं नेतृत्व करणारा तो दुसरा यष्टीरक्षक-फलंदाज बनला आहे. त्याच्या आधी फक्त महेंद्रसिंग धोनीने ही कामगिरी केली होती. पंतवर आता भारताला सलग दुसऱ्यांदा घरच्या मैदानावर कसोटी मालिका गमावण्यापासून रोखण्याची मोठी जबाबदारी आहे. संघानं पहिला सामना फक्त तीन दिवसांत 30 धावांनी गमावला, ज्यामुळं हा सामना भारतासाठी महत्त्वाचा ठरला. शिवाय, गुवाहाटी हे भारतात कसोटी सामना आयोजित करणारं 30वं ठिकाण बनलं आहे.

img

मी वेबसाईट साठी प्रभावी लिखाण करते. यासह अँकरिंगच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधण्याची आवड आहे. क्रिएटिव्ह कंटेन्ट लिहिणे, कार्यक्रमाचे निवेदन करणे ही माझी आवड असून मी पत्रकारिता आणि जनसंवाद या विषयात पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts