Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • मनोरंजन
  • तब्बल 15 वर्षांनी येणार 3 इडियट्सचा सिक्वेल; जाणून घ्या कोण साकारणार रँचो प्रियाची भूमिका
मनोरंजन

तब्बल 15 वर्षांनी येणार 3 इडियट्सचा सिक्वेल; जाणून घ्या कोण साकारणार रँचो प्रियाची भूमिका

3 Idiots sequel announcement after 15 years, with speculation about the actress playing Rancho’s love interest

3 Idiots sequel after 15 years : 2009 मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट ज्याने प्रत्येकाच्या मनात घर केले होते. तो चित्रपट आता तब्बल 15 वर्षांनी परत येतोय. त्या चित्रपटाचे नाव आहे 3 इडियट्स. होय आता या चित्रपटाचा सिक्वेल येणार असल्याची माहिती समोर आली आहे. आता या 3 इडियट चित्रपटात करीना कपूर, आर माधवन शर्मन जोशी पुन्हा एकत्र दिसणार आहे. या सिक्वे मध्ये नॉस्टॅल्जिया आणि नवी कथा या दोन्ही गोष्टी एकत्र पाहायला मिळतील.

2026 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार

ऑल इस वेल हा डायलॉग या 3 इडियट्स चित्रपटातून घराघरात पोहोचला होता. हा डायलॉग आज देखील चाहत्यांच्या मनात आहे. 15 वर्ष या चित्रपटाला रिलीज होऊन झाले तरीही हा चित्रपट अजूनही प्रेक्षकांना खिळवून ठेवतो. आता या चित्रपटाचा सिक्वेल 2026 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. याबाबत सोशल मीडियावर चर्चा रंगल्याचे दिसत आहे.

ही स्टारकास्ट असणार

या 3 इडियट्स चित्रपटातील सिक्वेल मध्ये कोण कोण कलाकार असणार असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. खास करून रँचो आणि फरहानची जोडी पुन्हा नव्याने झळकणार आहे. या चित्रपटाच्या दुसऱ्या भागात आमिर खान, करीना कपूर, आर माधवन, शर्मन जोशी पुन्हा एकत्र दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राजकुमार हिराणी हे करणार असून आमिर खान, विधू विनोद चोप्रा, राजकुमार हिराणी या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. याबाबत पिंक वेलाने माहिती दिली आहे.

हे ही वाचा : धुरंधर चित्रपटातील अक्षय खन्नाचा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल; ऑक्सिजन मास्क लावून शुटींग केले पूर्ण

कोण साकारेल रँचो आणि प्रिया ची भूमिका

ऑनस्क्रीन जोडी म्हणून आमिर खान आणि करीनाची जोडी प्रेक्षकांना भावली आहे. 3 इडियट्स मध्ये देखील आमिर खान आणि करीना यांची जोडी झळकली होती. जी प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. आता या जोडीची केमिस्ट्री पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. आता आमिर खान आणि करीन यांची जोडी रँचो आणि प्रिया या भूमिकेत मॅच होतील का आणि ते प्रेक्षकांना कितपत भावेल हे पाहणे योग्य ठरणार आहे.

15 वर्षांपूर्वी रिलीज झालेली 3 इडियट्स या चित्रपटात शिक्षण पद्धतीवर भर देण्यात आला होता. या चित्रपटाने 200 कोटींचा आकडा गाठला होता. हा आकडा गाठणारी ही  पहिली भारतीय फिल्म ठरली होती. आता या चित्रपटाच्या सिक्वेल मध्ये कहाणी काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

img

मी वेबसाईट साठी प्रभावी लिखाण करते. यासह अँकरिंगच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधण्याची आवड आहे. क्रिएटिव्ह कंटेन्ट लिहिणे, कार्यक्रमाचे निवेदन करणे ही माझी आवड असून मी पत्रकारिता आणि जनसंवाद या विषयात पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts