Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • मनोरंजन
  • रितेश देशमुखचा ‘राजा शिवाजी’ ब्लॉकबस्टर आधीच? रिलीजपूर्वीच 193 कोटींचा बिझनेस
Top News

रितेश देशमुखचा ‘राजा शिवाजी’ ब्लॉकबस्टर आधीच? रिलीजपूर्वीच 193 कोटींचा बिझनेस

Riteish Deshmukh Raja Shivaji: अभिनेता आणि दिग्दर्शक रितेश देशमुख यांचा आगामी ऐतिहासिक सिनेमा “राजा शिवाजी” प्रदर्शित होण्यापूर्वीच चर्चेचा विषय ठरला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

सिनेमाने अद्याप थिएटरमध्ये प्रवेशही केलेला नसतानाच त्याच्या नॉन-थियेट्रिकल हक्कांमधून मोठी कमाई झाल्याची माहिती समोर आली आहे. या व्यवहारांमुळे निर्मात्यांना आधीच मोठा आर्थिक फायदा झाल्याचं बोललं जात आहे.

हेही वाचा: महिलांसाठी मोठी अपडेट! ‘ई-केवायसी’ न केलेल्यांना आणखी एक महिना? दुरुस्तीची मुदत आज संपणार; मेमध्ये ३००० रुपयांचा लाभ शक्य

किती झाली कमाई?

मिळालेल्या माहितीनुसार, ‘राजा शिवाजी’ च्या OTT हक्कांची विक्री सुमारे ९५ कोटी रुपयांना झाली आहे. म्यूझिक राइट्समधून २८ कोटी रुपये मिळाले असून सॅटेलाइट हक्क 70 कोटी रुपयांना विकले गेले आहेत. या सर्वांची एकूण बेरीज जवळपास 193 कोटी रुपये होते.

सिनेमाचं अंदाजित बजेट सुमारे 120 कोटी रुपये असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे प्रदर्शनापूर्वीच प्रकल्पाने मोठ्या प्रमाणावर नफा कमावल्याचं चित्र आहे.

https://x.com/BURN4DESIRE1/status/2048954740227321902?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E2048954740227321902%7Ctwgr%5Eedf9ae880cb34680ce4538cccdaab088ae688893%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fmarathi.abplive.com%2Fentertainment%2Friteish-deshmukh-raja-shivaji-defeated-bhooth-bangla-before-release-rs-120-budget-earn-rs-193-crore-marathi-news-1422230

दरम्यान, सोशल मीडियावर या आकड्यांबाबत विविध चर्चा सुरू असून काही जण याला मोठा बिझनेस यश मानत आहेत, तर काही जण चित्रपटाच्या प्रत्यक्ष कामगिरीची प्रतीक्षा करत आहेत. जर हा सिनेमा थिएटरमध्ये अपेक्षित यश मिळवतो, तर तो मोठा हिट ठरू शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे.

Bhooth Bangla सारख्या अलीकडील चित्रपटांच्या तुलनेत ‘राजा शिवाजी’च्या प्री-रिलीज कमाईची चर्चा अधिक वाढली आहे.

हा सिनेमा 1 मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार असून त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

 

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts