Border 2 Indian Armed Forces Tribute : 23 जानेवारी रोजी बॉर्डर 2 हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित झाला. हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. तर प्रेक्षकांनी प्री तिकीट बुकिंग सेल मध्ये चित्रपट first day first show पाहण्यासाठी ऍडव्हान्स तिकीट बुकिंग करून घेतली होती. चित्रपट प्रदर्शित झाल्याच्या पहिल्या दिवशीच प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळाला. पहिल्याच दिवशी चित्रपटगृह हाऊसफुल झाल्याचे बघायला मिळाले.
ANI कडून मिळालेल्या माहितीनुसार, हा चित्रपट आज सकाळच्या सुमारास सिनेमागृहात प्रदर्शित झाला. त्यावेळी सिनेमागृह हाऊसफुल झाले होते. यावेळी प्रेक्षकांच्या डोळ्यात अश्रू आणि चेहऱ्यावर समाधानकारक हास्य दिसून आले. या चित्रपटाबाबत बोलताना अनेक प्रेक्षकांनी हा चित्रपट नक्की पाहावा असं संबोधले आहे. तर चित्रपटाबाबत बोलताना अप्रतिम ऍक्शन, भावना आणि दमदार अभिनय असल्याचे सांगितले.
बॉर्डर 2 या चित्रपटात सनी देओल मुख्य भूमिकेत दिसत आहे. या चित्रपटाची कथा 1971 च्या भारत आणि पाकिस्थान युद्धातील सत्य घटनेवर आधारित आहे. या चित्रपटामध्ये भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दल एकत्र येऊन कशा पद्धतीने युद्धाची तयारी करतात. हे प्रभावीपणे दाखवण्यात आले आहे.
हे ही वाचा : होमबाउंड चित्रपट ऑस्कर 2026 च्या शर्यतीतून पडला बाहेर; बेस्ट इंटरनॅशनल फिचर फिल्मसाठी झाला होता शॉर्टलिस्ट
बॉर्डर 2 पाहताना मन अभिमानाने भरून येते
ट्रेंड विश्लेषक तरण आदर्श यांनी बॉर्डर 2 या चित्रपटाबाबत सांगितले की, बॉर्डर 2 पाहत असताना मन अभिमानाने भरून येते. हा एक चित्रपट फक्त राष्ट्राला नाही तर भारतीय सशस्त्र दलाला देखील सलाम करतो. दिग्दर्शक अनुराग सिंग यांनी हा बॉर्डर 2 चित्रपट भावनिक आणि ताकदीचा युद्धपट साकारला आहे. या चित्रपटातील युद्धदृश्य थक्क करणारी असून प्रभावी मांडणी, लढाई, युद्ध प्रसंग सर्वकाही अप्रतिमरीत्या मांडले आहे. हा देशभक्ती, शौर्य आणि अभिमानाने भरलेला जबरदस्त चित्रपट आहे. हा चित्रपट बघताना मनात देशासाठी आदर आणि अभिमान निर्माण झाल्याशिवाय राहत नाही.
जुन्या बॉर्डर चित्रपटातील ‘घर कब आओगे‘ नव्याने संगीतबद्ध
बॉर्डर या गाजलेल्या चित्रपटाची परंपरा दिग्दर्शकांनी सुंदररित्या पुढे नेली आहे. या चित्रपटात शौर्य, त्याग आणि सैनिकांमधील मैत्री प्रभावीरीत्या दर्शवण्यात आली आहे. चित्रपटात स्फोट, रणनिती, जमीन आणि हवाई लढाई प्रभावीरीत्या दाखवण्यात आल्या आहे. या चित्रपटातील संवाद खूप प्रभावी आणि देशभक्तीने भरलेला आहे. चित्रपटातील संगीत खूपच सुंदर आहे. जुन्या बॉर्डर चित्रपटातील ‘घर कब आओगे‘ आणि ‘जाते हुए लम्हो‘ हे दोन गाणे नव्याने संगीतबद्ध करण्यात आले आहे.
#OneWordReview…#Border2: OUTSTANDING.
Rating: ⭐️⭐️⭐⭐️½
Power. Patriotism. Pride… #Border2 makes your heart swell with pride… The film salutes the nation as well as the armed forces… STRONGLY RECOMMENDED. #Border2ReviewDirector #AnuragSingh delivers a thunderous,… pic.twitter.com/C5Y2SgfBje
— taran adarsh (@taran_adarsh) January 22, 2026
संवाद आणि अभिनय प्रेक्षकांना भारावून टाकतात
बॉर्डर चित्रपटात सनी देओल मुख्य भूमिकेत असून चित्रपटाचा तो मुख्य आधार आहे. सुरुवातीपासून शेवटपर्यंत हा चित्रपट प्रभावी वाटतो. यासह दमदार संवाद आणि अभिनय प्रेक्षकांना भारावून टाकतात. या चित्रपटात वरुण धवनने चांगला अभिनय केला आहे. त्याची भूमिका देखील भावनिक आणि ताकदीची आहे. एवढेच नाही तर दिलजीत दोसांजचा अभिनय देखील समाधानकारक वाटतो.
प्रेक्षकांचे चित्रपटाबाबत मत
एका प्रेक्षकाने सिनेमापाहून आल्यानंतर ANI ला सांगितले कि, हा एक भावनिक प्रवास होता. तुम्ही हा चित्रपट पाहिल्यानंतर भरपूर हसाल, आणि रडालही. मी हा चित्रपट पाहत असताना 4 ते 5 वेळा तरी रडलो असेल. मला हा चित्रपट प्रचंड आवडला आहे. चित्रपटाची तुलना करणे अयोग्य ठरेल. तर दुसऱ्या प्रेक्षकाने बॉर्डर चित्रपटाचा सिक्वेल आणल्याबाबत दिग्दर्शक आणि कलाकारांचे कौतुक केले. यावेळी तो म्हणाला, मी तो चित्रपट काही दिवसांपूर्वी पाहिला होता. आणि पुन्हा बॉर्डर 2 आज पहिला. हा चित्रपट त्या परंपरेला पुढे घेऊन जातो.












