Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • मनोरंजन
  • धर्मेंद्र यांच्या अंत्यसंस्काराची घाई का केली? हेमा मालिनी यांनी पहिल्यांदाच सोडलं मौन 
Top News

धर्मेंद्र यांच्या अंत्यसंस्काराची घाई का केली? हेमा मालिनी यांनी पहिल्यांदाच सोडलं मौन 

hema malini and dharmendra

हेमा मालिनी यांनी चाहत्यांना अंत्यदर्शन का नाकारले गेले याचे खरे कारण सांगितले. २४ नोव्हेंबर रोजी, हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनाने संपूर्ण देश शोकात बुडाला. त्यांनी त्यांच्या ९० व्या वाढदिवसाच्या काही दिवस आधी त्यांच्या कुटुंबाच्या उपस्थितीत मुंबईतील त्यांच्या घरी अखेरचा श्वास घेतला. देओल कुटुंबाने शांततेत अंत्यसंस्कार केले, परंतु बॉलीवूडच्या लाडक्या “ही-मॅन” चे अंतिम दर्शन सर्वांसाठी का दिले गेले नाही, हे धर्मेंद्रचे चाहते समजूच शकले नाहीत.

यूएईचे चित्रपट निर्माते हमद अल रायमी जे धर्मेंद्रचे सगळ्यात मोठे चाहते आहेत, धर्मेंद्रवर त्यांनी आजवर अनेक व्हिडीओही केलेत. रायमी यांनी अलीकडेच शोक व्यक्त करण्यासाठी हेमा मालिनी यांच्या घरी भेट दिली. त्यानंतर रायमी यांनी सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये या भेटीचा उल्लेख केला आणि त्यात या गोष्टीचही स्पष्टीकरण दिले की, अखेर हेमा मालिनी यांनी अंत्यदर्शन का ठेवले नाही.

हेही वाचा  – 2025 ने दिले हे सुपरहिट चित्रपट; बॉक्स ऑफिसवर या चित्रपटांनी केला धमाका

हमद अल रायमी यांनी आपल्या पोस्टमध्ये सांगितले की, “धर्मेंद्रच्या निधनानंतर तिसऱ्या दिवशी जेव्हा मी पहिल्यांदा हेमा मालिनीसमोर बसले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर एक वेदना दिसत होती जी त्यांनी लपवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. त्यांच्या मनात एक खोल गोंधळ सुरू होता. आमच्या संभाषणादरम्यान त्यांचा आवाज वारंवार मंदावत होता.”

हेमा मालिनी म्हणाल्या…

“मला त्या दिवशी फार्महाऊसवर त्यांच्यासोबत असायला हवे होते, मी तिथे असते तर बरे झाले असते…शेवटच्या काळातला धर्मेंद्रजींचा चेहरा पाहण्यासाठी मी तरसत राहिले. मी धर्मेंद्रनां नेहमी सांगायचे की तुम्ही लिहलेल्या कविता आणि लेखन प्रकाशित करा पण ते म्हणायचे, मला अजून काहीतरी लिहू दे, मग मी करेन.”

धर्मेंद्रजींचे लाखो चाहते त्यांना शेवटचे पाहू शकले नाहीत याचं दुःख

चाहत्यांना शेवटचे का पाहू दिले नाही याचे कारण देखील हेमा मालिनी यांनी स्पष्ट केले, अत्यंत जड अंतःकरणाने त्या म्हणाल्या की, धर्मेंद्रजींचे लाखो चाहते त्यांना शेवटचे पाहू शकले नाहीत याचे मला सर्वात जास्त दुःख आहे, पण धर्मेंद्रजींना कधीच लोकांना कमजोर किंवा वेदनांमध्ये पहायला नाही आवडायचे. ते स्वत: सुद्धा नेहमीच दुःख लपवत आलेत. त्यामुळे अत्यंत जड अंत:करणाने आमच्या कुटुंबीयांनी हा निर्णय घेतला की चाहत्यांसाठी अंत्यदर्शन नाही ठेवायचे, थेट अंतिम संस्कार करण्याचा निर्णय घेतला.

img

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts