Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • ताज्या बातम्या
  • महिला दिनादिवशीच उल्हासनगरमध्ये महिलेला मारहाण, धार्मिक तेढ निर्माण होण्याची चिन्ह
Mumbai

महिला दिनादिवशीच उल्हासनगरमध्ये महिलेला मारहाण, धार्मिक तेढ निर्माण होण्याची चिन्ह

Woman beaten

Woman beaten : उल्हासनगर-५ मधील वीर तानाजी नगर, सेक्शन ४० परिसरात घरासमोर वाहन उभे करण्याच्या कारणावरून दोन समुदायामध्ये वाद होऊन मारहाणीची घटना घडल्याने हिललाईन पोलीस ठाण्यात सामाजिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात धार्मिक वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

महिला फिर्यादीने (वय ३६) दिलेल्या तक्रारीनुसार, ५ मार्च रोजी रात्री सुमारे ९ ते ९.३० वाजण्याच्या सुमारास शेजारी राहणारा मोसीन शेख हा त्याची अ‍ॅक्टिव्हा गाडी पिडीत महिलेच्या घरासमोर उभी करत होता. त्यावेळी पिडीत महिलेने येथे आमचा टेम्पो उभा करण्याची जागा असल्याचे मोहसीन शेख यास सांगितल्याने वाद झाला. या वादातून मोहसीन शेख याने पिडीतेला अश्लील शिवीगाळ करून मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

पिडीत महिला व तिच्या भावजयला लाकडी दांडक्याने जबर मारहाण

तक्रारीनुसार, मोहसीनचा भाचा गुंगा उर्फ आरीफ याने घटनास्थळी येऊन पिडीत महिला व तिच्या भावजयला लाकडी दांडक्याने जबर मारहाण केली, तसेच पिडीतेचा विनयभंग केला आहे.तीच्या अल्पवयीन मुलाचा शारीरिक छळ करुन त्याला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली.तर आसमा शेख हिने मुलींचे केस ओढून मारहाण केली.

भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या व्यक्तीवर मारहाणीचा दखलपात्र गुन्हा

सदर घटनेनंतर पिडीता व मारहाण झालेली भावजय या हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यास गेल्या असता त्यांना आधी उपचारासाठी दवाखान्यात पाठवण्यात आले. ती संधी साधून आरोपी हे पोलीस ठाण्यात गेले तेथे त्यांनी पोलिसांना खोटी माहिती देऊन पिडीत महिला व तीच्या पतीसह भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या मुखर्जी नावाच्या व्यक्तीवर मारहाणीचा दखलपात्र गुन्हा दाखल केला.

लोकांना बोलावून परीसरात दहशत निर्माण केल्याचा आरोप

भांडणात गायकवाड यांनाही दुखापत झाली आहे. तसेच मन्सूर सय्यद याने शिवीगाळ करून इतर गैर कायदेशीर लोकांना बोलावून परीसरात दहशत निर्माण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. घटनेचे सत्यशोधन करून अण्णा पंडीत यांनी वरिष्ठ पोलीस अधिका-यांची भेट घेऊन घडलेल्या गंभीर सामाजिक अत्याचाराची दखल घेण्यास भाग पाडले. संघटनेकडुन आरोपींना अटक करुन पिडीत कुटुंबाला व साक्षीदाराला त्वरीत पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आहे.

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts