Pune Palkhi Traffic: पंढरीच्या आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी पुण्यातील पालखी मार्गावरील प्रमुख रस्त्यांवर टप्प्याटप्प्याने वाहतूक बंद राहणार आहे. कोणते मार्ग बंद राहतील आणि पर्यायी मार्ग कोणते असतील, ते जाणून घ्या.
संत ज्ञानेश्वर महाराज (Sant Dnyaneshwar Maharaj) आणि संत तुकाराम महाराज (Tukaram Maharaj Palkhi) यांच्या आषाढी वारी (Ashadhi Wari 2026) पालखी सोहळ्याच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील वाहतुकीत महत्वाचे बदल करण्यात आले आहेत. पालखी मार्गावरील (Palkhi route) वाहतूक गुरुवारी (९ जुलै) तीन टप्प्यांमध्ये बंद ठेवण्यात येणार असून, नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन पुणे पोलिसांनी (Pune Police) केले आहे.
अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील (Manoj Patil) यांनी दिलेल्या माहितीनुसार, पालखीचे आगमन आणि वारकऱ्यांची मोठी गर्दी लक्षात (Pune Palkhi Traffic) घेऊन वाहतूक नियोजन करण्यात आले आहे.
हेही वाचा: अनेक वर्षांनंतर विधानभवनात शरद पवारांची एन्ट्री; स्वागतासाठी नेत्यांची मोठी गर्दी
पहिला टप्पा
पहाटे ३.०० ते सायंकाळी ५.०० या कालावधीत बोपखेल फाटा, कळस, विश्रांतवाडी, फुलेनगर, आळंदी रोड जंक्शन, चंद्रमा चौक, सादलबाबा चौक, संगमवाडी मार्ग, वाकडेवाडी, खडकी आणि पाटील इस्टेट चौक या परिसरातील वाहतूक (Pune city news) पूर्णपणे बंद राहणार आहे.
दुसरा टप्पा
दुपारी १२.०० ते सायंकाळी ६.०० या वेळेत गणेशखिंड रस्ता, नामदार गोपाळकृष्ण गोखले (फर्ग्युसन) रस्ता, जंगली महाराज रस्ता आणि कर्वे रस्ता या प्रमुख मार्गांवर वाहतुकीवर निर्बंध लागू असतील.
तिसरा टप्पा
सायंकाळी ५.०० नंतर छत्रपती शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता, लक्ष्मी रस्ता तसेच शहरातील प्रमुख पेठांमधील वाहतूक टप्प्याटप्प्याने बंद केली जाणार आहे.
नागरिकांना पोलिसांचे आवाहन
वाहतुकीतील बदल लक्षात घेऊन नागरिकांनी प्रवासाचे नियोजन आगाऊ करावे, पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि शक्य असल्यास गर्दीच्या वेळेत पालखी मार्ग टाळावा, असे आवाहन पुणे पोलिसांनी केले आहे.
पालखीचे लाइव्ह लोकेशन येथे पाहा
वारकऱ्यांची पालखी सध्या कुठे आहे, याची अद्ययावत माहिती आणि लाइव्ह लोकेशन पुढील संकेतस्थळावर उपलब्ध आहे:
https://diversion.punepolice.gov.in/palkhi/track












