Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेस ( शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज अनेक वर्षानंतर महाराष्ट्र विधानभवनात हजेरी लावली. पावसाळी अधिवेशन सुरू असताना त्यांच्या आगमनाने विधानभवन परिसरात विशेष उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. विविध पक्षांतील नेते, आमदार आणि प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांच्या स्वागतासाठी मोठी गर्दी केली होती.
विधानभवनात (Vidhanbhavan) पोहोचताच शरद पवार (Sharad Pawar) यांचे अनेक आमदार आणि वरिष्ठ नेत्यांनी स्वागत केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, रोहित पाटील, संदीप क्षीरसागर, उत्तम जानकर, अभिजित पाटील, राजू खरे, नारायण पाटील आणि बापू पठारे यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी उपस्थित होते. संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही त्यांची भेट घेऊन स्वागत केले.
हेही वाचा: आता ‘इतर हक्क’ नाही; वनपट्टाधारकांना मिळणार स्वतंत्र ओळख, 7-ई आणि 12-ई नोंदी लागू
बेळगाव सीमा प्रश्नावर महत्वपूर्ण बैठक
शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत आज बेळगाव सीमा प्रश्नासंदर्भात उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Pawar) , उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Deputy Chief Minister Eknath Shinde) , माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे( Former Union Minister Narayan Rane), उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Deputy Chief Minister Sunetra Pawar) यांच्यासह अन्य मान्यवर सहभागी झाले. महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या सीमा प्रश्नावर पुढील रणनीती आणि कायदेशी बाबींवर चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अनेक वर्षानंतर विधानभवनात उपस्थिती
शरद पवार (Sharad Pawar) यांची विधानभवनातील उपस्थिती अनेक वर्षानंतरची असल्याने ती विशेष चर्चेचा विषय ठरली. यापूर्वी राज्यसभा निवडणुकीसाठी नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याच्या वेळी ते विधानभवनात आले होते. त्यानंतर प्रथमच ते विधिमंडळ परिसरात दिसल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चाना उधाण आले आहे.
आगमनाकडे सर्वांचे लक्ष
शरद पवार (Sharad Pawar) विधानभवनात दाखल होताच प्रसारमाध्यमांचे कॅमेरे आणि उपस्थित नेत्यांनी त्यांच्याभोवती गर्दी केली. प्रकृतीच्या करणास्तव ते सावकाश चालत विधानभवनात प्रवेश करताना दिसले. त्यांच्या सोबत पक्षातील अनेक वरिष्ठ नेते आणि आमदार उपस्थित होते.
बेळगाव सीमा प्रश्नवरील बैठकीतील चर्चेकडे आता राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून, या बैठकीनंतर पुढील भूमिका स्पष्ट होण्याची शक्यता आहे.












