Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • “मी रोहितचा बाप असलो तरी…” राजेंद्र पवारांच्या विधानाची चर्चा; रोहित पवारांचे आंदोलन तिसऱ्या दिवशीही सुरू
ताज्या बातम्या

“मी रोहितचा बाप असलो तरी…” राजेंद्र पवारांच्या विधानाची चर्चा; रोहित पवारांचे आंदोलन तिसऱ्या दिवशीही सुरू

Rohit Pawar Father Rajendra Pawar Statement

Rohit Pawar Father Rajendra Pawar Statement: शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनी सुरू केलेले अन्नदान आंदोलन तिसऱ्या दिवशीही सुरू आहे. पंढरपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सुरू असलेल्या या आंदोलनाला दिवसेंदिवस अधिक पाठिंबा मिळताना दिसत आहे.

रोहित पवार यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी त्यांचे वडील राजेंद्र पवारही आंदोलनस्थळी उपस्थित राहिले. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, रोहित पवार हे वैयक्तिक हितासाठी नव्हे तर राज्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी लढत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनीही आपल्या हक्कांसाठी पुढे येण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

हेही वाचा: WhatsApp यूजर्ससाठी गुड न्यूज! आता Meta One सब्सक्रिप्शनमध्ये मिळणार जबरदस्त AI टूल्स, कसे वापरायचे? पाहा

रोहित पवार यांची प्रमुख मागणी

दरम्यान, कर्जमाफीसंदर्भातील अटी शिथिल करून शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, ही रोहित पवार यांची प्रमुख मागणी आहे. सरकारने याबाबत ठोस निर्णय घेतल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.

आज आंदोलनाचा तिसरा दिवस असल्याने विविध राजकीय पक्षांतील नेते, आमदार आणि खासदार आंदोलनस्थळी भेट देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे या आंदोलनाकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

तर दुसरीकडे, राज्य सरकारकडून आंदोलनकर्त्यांशी संवाद सुरू असल्याची माहिती मिळत आहे. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आणि सरकार मंत्री बाळासाहेब पाटील हे सातत्याने रोहित पवार यांच्या संपर्कात असल्याचे सांगितले जात आहे. मात्र आंदोलनाच्या मुख्य मागण्यांवर अद्याप अंतिम निर्णय झालेला नसल्याने परिस्थती कायम आहे.

मनोज जरांगे पाटील यांचा आज पंढरपूर दौरा

याच पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचा आज पंढरपूर दौरा असल्याचे चर्चाना उधाण आले आहे. त्यांच्या समर्थकांनी आधीच रोहित पवार यांच्या आंदोलनाला समर्थन दिले आहे. त्यामुळे जरांगे पाटील प्रत्यक्ष आंदोलनस्थळी भेट देऊन जाहीर पाठींबा करतात का, याकडे राजकीय वर्तुळासह सर्वसामान्यांचेही लक्ष लागले आहे.

आता सरकार आणि आंदोलनकर्ते यांच्यातील चर्चेतून तोडगा निघणार की आंदोलन आणखी तीव्र होणार, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts