Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • राज्याच्या राजकारणातल्या आत्ताच्या सर्वात मोठ्या ”या आहेत ४ महत्त्वाच्या घडामोडी
Top News

राज्याच्या राजकारणातल्या आत्ताच्या सर्वात मोठ्या ”या आहेत ४ महत्त्वाच्या घडामोडी

Nana Patole-Eknath Shinde-Devendra Fadanvis

4 important political developments in the state : सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. त्यामुळे राजकीय नेत्यांचे एकमेकांवर वार-प्रतिवार पाहायला मिळत आहेत. त्यापैकी आताच्या राज्याचा राजकारणातील सर्वात मोठ्या ४ घडामोडींची माहिती आपण घेऊया..  राज्य निवडणूक आयुक्तांची तातडीने हकालपट्टी करण्यात यावी, असा प्रस्ताव काँग्रेस नाना पटोले यांनी विधानसभेत मांडला आहे. तर दुसरी ओबीसी समाजाला मिळणाऱ्या निधीवरून सत्ताधारी महायुतीच्या आमदारांमध्येच खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाली. आमदार महेंद्र दळवी यांच्यानंतर एकनाथ शिंदेंच्या आणखी एका नेत्याचा पैशांच्या बंडलांसह फोटो समोर आल्याने खळबळ उडाली आहे. लाडकी बहीण योजनेत तुम्ही खोडा घालण्याचा प्रयत्न केला; पण बहिणींनी तुम्हाला जोडा दाखवला, अशी टीका उपमुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांवर केली.

राज्य निवडणूक आयुक्तांना हटवा; नाना पटोलेंचा विधानसभेत प्रस्ताव

राज्य निवडणूक आयुक्तांची तातडीने त्यांच्या पदावरून हकालपट्टी करण्यात यावी, असा प्रस्ताव काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी विधानसभेत मांडला. नगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुकीच्या मतदानाच्या आदल्या दिवशी काही स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणुका पुढे ढकलून घोळ घालणाऱ्या राज्य निवडणूक आयुक्तांवर महाभियोग दाखल करावा, अशी मागणीदेखील त्यांनी यावेळी केली. त्यांची ही मागणी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी फेटाळून लावली. संविधानानुसार निवडणूक आयुक्तांना हटवण्याचे अधिकारी विधानसभेला नाहीत. त्याचे सर्वाधिकार लोकसभेला असून त्यासाठी आवश्यक प्रक्रियेची माहिती संविधानात स्पष्टपणे दिली आहे. विधानसभा घटनेनुसार चालते, असे सांगून राहुल नार्वेकर यांनी नाना पटोले यांच्या निवेदनावर घटनेतील तरतुदींची सविस्तर माहिती वाचून दाखवली.

हेही वाचा – मुंबई महापौर पदावरून भाजपमध्येच मतभेद, किरीट सोमय्याने लोढांना फटकारलं

ओबीसी निधीवरून महायुतीचेच आमदार एकमेकांना भिडले

ओबीसी समाजाला मिळणाऱ्या निधीवरून सत्ताधारी महायुतीच्या आमदारांमध्ये विधानपरिषदेच्या सभागृहातच खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले. इतर मागासवर्गीयांसाठी असलेल्या विविध योजनांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वित्त विभागाकडून पुरेसा निधी मिळत नसल्याची तक्रार भाजपाचे आमदार परिणय फुके यांनी केली. वित्त विभाग ओबीसी समुदायाच्या विरोधात आहे का? असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला. त्यावर अजित पवार यांच्या पक्षाचे आमदार संतापल्याचे पाहायला मिळाले.

शिंदेंच्या आणखी एका बेड्या नेत्याचा पैशांच्या बंडलांसह फोटो समोर

तीन दिवसांपूर्वी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी शिंदे गटाचे आमदार यांचा पैशाच्या बॅगेसह व्हिडिओ माध्यमांमध्ये व्हायरल झाला होता. हे प्रकरण ताजे असतानाच शिंदे गटाच्या आणखी एका बड्या नेत्याचा पैशांच्या बंडलासह फोटो समोर आला आहे. हे नेते दुसरे तिसरे कोणी नसून नेहमी या ना त्या कारणाने चर्चेत असलेले मंत्री भरत गोगावले आहेत. यांचे हे फोटो शेतकरी कामगार पक्षाच्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी प्रसिद्ध केले आहेत. त्यामुळे ऐन अधिवेशनाच्या काळात विरोधकांच्या हाती आयते कोलीत सापडले असून शिंदे गटाच्या अडचणीत वाढ झाली आहे. चित्रलेखा पाटील यांनी मंत्री भरत गोगावले आणि महेंद्र दळवी यांच्यावर कंत्राटाच्या कामात कमिशन घेतल्याचा गंभीर आरोपही केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी केली पाटील यांनी केली आहे.

लाडकी बहीण योजनेत खोडा घालणाऱ्यांना जोडा दाखवला – एकनाथ शिंदे

लाडकी बहीण योजनेत तुम्ही खोडा घालण्याचा प्रयत्न केला; पण बहिणींनी तुम्हाला जोडा दाखवला, अशी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर केली. ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी विधिमंडळ अधिवेशनात लाडकी बहीण योजनेवरून सरकारला प्रश्न विचारले. या योजनेतील लाभार्थी महिलांची संख्या वाढायला हवी. दिवसेंदिवस ती कमी होत चालली आहे. याचा अर्थ या योजनेत काही गरबड किंवा भ्रष्टाचार झाला आहे का? तुम्ही समाधानकारक उत्तर देत नसल्याने आम्ही तुमचा निषेध करतो, असे भास्कर जाधव म्हणाले. त्यावर प्रत्युत्तर देताना एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले.

img

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts