Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • मुंबई महापौर पदावरून भाजपमध्येच मतभेद, किरीट सोमय्याने लोढांना फटकारलं
ताज्या बातम्या

मुंबई महापौर पदावरून भाजपमध्येच मतभेद, किरीट सोमय्याने लोढांना फटकारलं

Mumbai Mayor

BJP Mumbai Mayor Dispute : राज्यात कोणत्याही क्षणी महानगरपालिकांच्या निवडणुका लागण्याची शक्यता असताना भाजपमधील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. मुंबई महानगरपालिकेचा महापौर आपल्याचा पक्षाचा व्हावा, ही प्रत्येक राजकीय पक्षाची इच्छा असते. त्या पद्धतीने निवडणुकीची तयारी देखील करण्यात येत आहे. सर्वच पक्षाने निवडणुकीचे रणशिंग फुंकले असून मैदानात उतरले आहेत. अशातच आता मुंबईत महापौर कोण होणार अशी चर्चा रंगली आहे. महायुतीतील नेत्यांनी मुंबईत महायुतीचाच महापौर बसेल असा दावा केला आहे. तर मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मात्र मुंबईत भाजपचा महापौर असेल यावरून भाजपमध्येच मतभेद असल्याच समोर आल आहे. कारण आता माजी खासदार किरीट सोमय्या यांनी लोढा यांना फटकारलं आहे.

किरीट सोमय्याकडून मंत्री लोढा यांची कान उघडणी

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांना याबाबत विचारणा करण्यात आली होती. यावर बोलताना सोमय्या म्हणाले की, महापौरसाठी भाजप लढत नाहीये. जे नेते महापौर महापौर पद म्हणत आहे त्यांना मी सांगितलं आहे आणि मुख्यमंत्र्यांना सांगितल आहे की त्यांना आवरा. कसली कॉलर टाइट, कसलं महापोर पद. आमच्या डोळ्यासमोर मुंबई आहे कोविडच्या काळात ठाकरे सेना कमाई करत होती. खिचडी, रेमडेसिवर घोटाळा झाला. आम्हाला महापालिका भ्रष्टाचारापासून मुक्त करायची आहे. मुंबईचा विकास करणे हे आमचे लक्ष आहे. त्यामुळे महापौर पद आणि कॉलर टाइटचा प्रश्नच नाही. देवेंद्र फडणवीस असो किंवा नरेंद्र मोदी, मुंबई जे पंचवीस वर्षात ठाकरे सेनेने लुटली आहे त्या मुंबईचा विकास आम्ही करणार आहोत.

हेही वाचा – भाजप नेत्याचा खळबळजनक दावा, २०५० पर्यंत मुंबई मुस्लिमांच्या ताब्यात जाणार..

काय म्हणाले होते, मंत्री मंगलप्रभात लोढा..

आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीवर बोलताना मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी एका कार्यक्रमात म्हटले होते की, ‘मुंबई महानगर पालिकेत जेव्हा भाजपचा महापौर बनेल, त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्याच्या शपथविधीसाठी महापालिकेत जातील, त्यावेळी तुमची आणि माझी कॉलर टाईट टाईट होईल. भाजप हा पक्षा देवाभाऊंचा आहे, राज्यातील इतर पक्षही देवेंद्र फडणवीसांच्या इशाऱ्यावर चालतात.’

बनावट जन्म प्रमाणपत्र घोटाळा उघडकीस आणला

किरीट सोमय्या यांनी बनावट जन्म प्रमाणपत्र घोटाळा उघडकीस आणला आहे आणि याबाबत आता मुलुंड पोलिसांनी देखील दखल घेत गुन्हा दाखल केला आहे. मुंबईतील कुर्ला येथील उर्दू महानगरपालिका शाळेमध्ये शाळेच्या दाखल्या संदर्भात नावामध्ये देखील तफावत आढळल्याचे समोर आले आहे. तर दुसरीकडे कुर्य्यामध्ये शिधावाटप कार्यालयात देखील शिधापत्रिका मध्ये अधिकची नावे चढवल्याचा प्रकार समोर आलेला आहे. असे अनेक डॉक्टर आहेत त्यांनी बनावट जन्म प्रमाणपत्र दाखला दिला असल्याचे कागदी पुरावे समोर आले आहे. यामुळे बांगलादेशी घुसखोरी मोठ्या प्रमाणात होत असल्याचं चित्र समोर आल आहे.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts