Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • कारवाई होणार ? लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या सरकारी महिलांवर होणार कारवाई; वसुलीचे देखील आदेश 
Pune

कारवाई होणार ? लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या सरकारी महिलांवर होणार कारवाई; वसुलीचे देखील आदेश 

Action Likely Against Women Who Availed Beloved Sister Scheme Benefits

Action against Beloved ladaki bahin Scheme beneficiaries : सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका पार पडल्या. आता सर्वत्र निकालाची वाट पाहणे सुरु असून महापलिक निवडणुकांची तयारी सुरु झाली आहे. अशातच आता महायुती सरकारने सुरु केलेली लाडकी बहीण योजना बंद पडते कि काय असा सवाल महिलांना पडला होता. त्यानंतर आता राज्यातील लाडक्या बहिणींना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मोठे गिफ्ट मिळण्याची शक्यता होती. त्यानंतर अनेकांनाकी साथ 2 महिन्यांचा हप्ता एकदाच खात्यात जमा झाला. तर आता सरकारी लढाई बहिणींनी योजनेचा लाभ घेतल्याची आकडेवारी समोर आली हे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावरच लाभार्थी महिलांना या योजनेचा लाभ घेता आला. या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही नियम अति लागू करण्यात आल्या होत्या. केवायसी, सरकारी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही, उत्पन्न ,यासारख्या अटी ठेवण्यात आल्या. एकंदरीत गरजू महिलांसाठी ही योजना राबविण्यात येत होती. परंतु अनेक सरकारी कर्मचारी असलेल्या महिलांनी आणि अधिकारी महिलांनी देखील या योजनेचा लाभ घेतला. तर काही पुरुषांनी देखील या योजनेचा फायदा उचलला. आता याबाबत लेखी अहवाल समोर आला आहे.

हे ही वाचा : महिला डॉक्टराच्या हातीवरील अक्षर कोणाच? फाॅरेन्सिक रिपोर्ट आले; फडणवीसांची सभागृहात माहिती

एवढ्या सरकारी महिलांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ

राज्यातील 9 हजार 526 सरकारी कर्मचारी असलेल्या महिलांनी 14 कोटी 50 लाख रुपये इतका लाभ घेतला असून 14,298 पुरुषांनीही लाडकी बहिणी होऊन 21.44 कोटी लुटले. असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.  महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी याबाबतची लेखी माहिती दिली आहे. आता या सरकारी लाडक्या बहिणींवर कारवाई करण्यात येणार असल्याची देखील माहिती समोर आली हे.

दिले वसुलीचे आदेश

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी विविध विभागांकडून रक्कम वसुलीचे आदेश दिले आहे. संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाईचे निर्देश देखील देण्यात आले असून तपासात अडथळा आणल्यास कारवाईपासून कोणीही सुटणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. आता  राज्य सरकारकडून याप्रकरणी गंभीरतेने कार्यवाही सुरू करण्यातआली असून अनेक जणांच्या अडचणी वाढण्याची आता दाट शक्यता आहे.

img

मी वेबसाईट साठी प्रभावी लिखाण करते. यासह अँकरिंगच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधण्याची आवड आहे. क्रिएटिव्ह कंटेन्ट लिहिणे, कार्यक्रमाचे निवेदन करणे ही माझी आवड असून मी पत्रकारिता आणि जनसंवाद या विषयात पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts