Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • ताज्या बातम्या
  • महिला डॉक्टराच्या हातीवरील अक्षर कोणाच? फाॅरेन्सिक रिपोर्ट आले; फडणवीसांची सभागृहात माहिती
Top News

महिला डॉक्टराच्या हातीवरील अक्षर कोणाच? फाॅरेन्सिक रिपोर्ट आले; फडणवीसांची सभागृहात माहिती

Devendra Fadanvis Assembly Speech

Phaltan female doctor suicide case : साताऱ्यातील फलटन येथे महिला डाॅक्टरने आत्महत्या केल्याचा मुद्दा नागपुरातील हिवाळी अधिवेशनात मांडण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. महिला डाॅक्टर फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करत होती. महिला डाॅक्टरने २३ ऑक्टोबर रोजी फलटणमधील एका हाॅटेलमध्ये आत्महत्या केली. हातावर लिहिलेल्या एका सुसाईट नोटमध्ये तिने पीएसआय गोपाळ मदने आणि प्रशांत बनकर यांची नावं लिहिली होती. तरुणीच्या हातावर नेमकं कोणाचं हस्ताक्षर आहे याची मागील अनेक दिवसांपासून सर्वांना उच्छुकता होती. याबाबत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली आहे.

फलटणमधील एका महिला डाॅक्टरने आत्महत्या केल्यानंतर आपण तपासासाठी एसआयटी नियुक्त केली. त्यासंदर्भात न्यायालयीन चौकशीही सुरू केली आहे. फाॅनेन्सिक रिपोर्टनुसार, महिला डाॅक्टरने हातावर लिहिलं आहे ते तिचेच असल्याचे निष्पन्न झाले आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची माहिती देताना सांगितलं. या प्रकरणात पोलीस अधिकारी बदने यांनी तिची फसवणूक आणि शारिरीक शोषण केल्याचं दिसत आहे. लग्नाचं आमिष दाखवल्याचं लक्षात येतं. नंतर मात्र बदनेंनी वेगळी भूमिका घेतली, असंही त्यांनी सांगितलं.

महिला डॉक्टरने तोही रिपोर्ट अनफिट दिला

आरोपीला अटक झाल्यानंतर तो अटकेसाठी फिट आहे की नाही यासंदर्भातील रिपोर्ट घ्यावा लागतो. सदर महिला डॉक्टरने तोही रिपोर्ट अनफिट दिल्याने पोलिसांनी एक मोठं पत्र परिष्ठांना लिहिलं. हे मोठे गुन्हेगार असून, त्यांना अनफिटचं प्रमाणपत्र दिलं जात आहे अशी तक्रार त्यांनी केली. यानंतर चौकशी झाली आणि तिने ही पत्र लिहिलं. पण हे सगळं ५ महिन्यापूर्वीचं आहे, माहिती फडणवीस यांनी दिली आहे. 

हातावर जे काही लिहिलं आहे ते अक्षर महिलेचंच आहे 

आत्महत्येमागे बदनेने केलेली फसवणूक आणि त्या परिस्थितीचा फायदा घेत दुसऱ्या आरोपीनेही फसवणूक केली. दोघांचं नाव लिहून आत्महत्या केली आहे. या रिपोर्टमध्ये दोन गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत. गळफास लावून आत्महत्या झाली आहे. हातावर जे काही लिहिलं आहे ते अक्षर महिलेचंच आहे. तपास अजून संपलेला नाही. चार्जशीट लवकरच दाखल होईल. समांतरपणे अनके गोष्टी सांगण्यात आल्या. त्यांची चौकशी करण्यासाठी न्यायमूर्तीची नेमणूक केली आहे, महिला आयपीएस अधिकाऱ्याच्या माध्यमातून तपास सुरु आहे, अशी माहिती फडणवीसांनी दिली आहे.

नवीन कायद्याप्रमाणे फॉरेन्सिक पुरावे गोळा केले आहेत

डिजिटल, तांत्रिक पुरावे आहेत. व्हॉट्सअॅ चॅट प्राप्त झाले आहेत. महिला डॉक्टर हॉटेलात आल्या, रुममध्ये गेल्या याचे सर्व सीसीटीव्ही पोलिसांच्या ताब्यात आहेत. कोण आलं, कोण गेलं याचीही माहिती आहे. नवीन कायद्याप्रमाणे फॉरेन्सिक पुरावे गोळा केले आहेत. काही गोष्टींची पडताळणी केली जात आहे. ६० दिवसात चार्जशीट दाखल केली जाते, तीदेखील अंतिम टप्प्यात आहे. आरोपींऐवजी अजून कोण आहे आहे का याचीच माहिती मिळवण्यासाठी न्यायालयीन चौकशी सुरु आहे, असंही त्यांनी सांगितलं.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts