Ajit Dada Plane Crash Details : अजित पवार यांचे 28 जानेवारीला बारातमीजवळ विमान अपघातात निधन झाले. या घटनेमुळे संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली होती. अजित दादांच्या अपघातावर अनेक नेत्यांनी शंका उपस्थित केली आहे. अशातच आज अजित पवार यांचे पुतणे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले आहे. रोहित पवार यांनी अपघाताच्या दिवशी नेमकं काय घडलं याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.
रोहित पवार यांनी म्हटले की, दादांचा मुंबई ते बारामती प्रवास. 210 किलोमीटर, 27 मिनिट लागणार होतं. व्हिएसआर नावाच्या कंपनीचं विमान होतं. अमेरिकेत विमान तयार झालं. विमानात लेफ्ट साईटला दादा बसले असावेत. दुसऱ्या सेक्शनमध्ये बॅगा होत्या. पाठी मागे. पेट्रोलच्या टाक्या आहेत. या कंपनीची लेअरजेटच्या बाबत त्यांची देशात मोनोपॉली आहे. सर्वाधिक लेअरजेटची विमाने त्यांच्याकडे आहे.
हेही वाचा – जिल्हा परिषद पंचायत समिती नेतेमंडळी सामान्याचा नेता, गावखेड्याची सत्ता
दादा गेल्याची बातमी आली मन आणि डोकं सुन्न झालं
दादांच्या अपघाताच्या दिवशी 7 वाजून 2 मिनिटाला क्रूर पोहोचले. कॅप्टनने चेक केलं. बारामती एअरपोर्टला फोन केला असेल. व्हिजीबिलीटी आहे का विचारलं. 7 वाजून 10 मिनिटाने ओकेचा मेसेज आला. दादांचे पीसए विदीप जाधव आले. दादा 7.30 वाजता पोहोचले. विमानाने उड्डाण केले. 8.22 ला विमान लोणावळा. 8.25 वाजता पुण्याजवळ, 8.30 वाजता यवतला. 8.32 ला सुपेजवळ पोहोचले. त्यानंतर 8.43 ते 8.45 दरम्यान अपघात होतो. 9 वाजता दादा जखमी असल्याची बातमी आली. पण 9.45 वाजता दादा गेल्याची बातमी आली. त्यामुळे मन आणि डोकं सुन्न झालं.
दोन दिवस आधी हे विमान सुरतला जाऊन आलं
पुढे बोलताना रोहित पवार म्हटले की, विमानाचं अॅप आहे. युनिव्हर्सल अॅप आहे. त्यात गेल्यावर किती वर्षापूर्वीचं विमान होतं हे कळतं. हे विमान 16 वर्षापूर्वीचं आहे. 25 आणि 26 ला हे विमान सुरतला जाऊन आलं होतं. कंपनीचे मालक सिंग म्हणाले, विमान चांगल्या स्थितीत होते. मेंटेन होते. वैमानिक अनुभवी आहे. अपघात व्हिजिबिलीटीमुळे झाल्याची शक्यता आहे. गावाच्या वरून विमान गेलं तेव्हा लोकांनी सांगितले की आवाज वेगळा येत होता. म्हणजे मेंटेनन्समध्ये प्रॉब्लेम असेल. विमान आलं टिल झालं आणि पडलं. हे सीसीटीव्ही फुटेजमधून दिसलं असंही रोहित पवार म्हणाले.
नोकरीवरून काढण्याची पायलटला धमकी दिली
रोहित पवार यांनी म्हटले की, आपले दादा गेले. आज व्हिएसआर कंपनी सीएम, इतर मंत्र्यांना विमानसेवा पुरवते. त्यांच्या संरक्षणाची काळजी घेतली पाहिजे. व्हिएसआरला फेव्हर का केलं जातं? व्हिएसआरचा एवढा होल्ड का आहे? आम्ही डीजीसीआरच्या काही लोकांशी बोललो. पायलटने एकदा विमान उडवल्यानंतर पुन्हा तो 12 तासानंतरच फ्लाईट उडवू शकतो. पण कंपनी सात तासापूर्वीच पायलटला विमान उडवायला सांगतात. नोकरीवरून काढण्याची धमकी दिली जाते. कॉस्ट कटिंगमध्ये ही कंपनी माहीर आहे असा आरोप रोहित पवार यांनी केला आहे.
विमान कंपनीला घाई होती, म्हणून विमान उतरवलं
पुढे बोलताना रोहित पवार यांनी म्हटले की, एखाद्या विमानतळावर व्हिजिबिलिटीचा इश्यू असेल तर पायलटला दोन स्टेशन सांगावं लागतं. मुंबई किंवा हैद्राबाद हे स्टेशन असू शकतात. विमान अजितदादांना घेऊन बारामतीला जाणार होते. त्यानंतर ते शमशाबाद ते पटनाला जायचे होते. विमान कंपनीला घाई होती. त्यामुळे पायलटने व्हिजिबिलिटी कमी असताना विमान उतरवलं अशी आम्हाला शंका आहे. कारण जर हे विमान पुणे किंवा इतर ठिकाणी गेले असते तर कंपनीचं 10 लाखाचं नुकसान झालं असतं. त्यामुळे कंपनीकडून पायलटवर प्रेशर होतं असा आमचा दावा आहे.
विमानात स्टॉल वॉर्निंग सिस्टिम बंद होती
पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले की, विमानात स्टॉल वॉर्निंग सिस्टिम बंद होती. त्यामुळे ही घटना घडली असावी. याचं बेस मेंटेनन्स केलं कोणी? पीपीटी चालू होतं, यातून कॉकपीटमध्ये चालू असतं ते कळतं. मेन पायलट कपूर असेल तर पाठक को पायलट असतात. को पायलट इंटरॅक्शन करतात. पीटीटी दाबूनही त्यात काही आवाज येत नव्हता. म्हणजे ती सिस्टिम बंद होती. ब्लॅक बॉक्स रिकव्हर केल्यावर अनेक गोष्टी कळतील असंही रोहित पवार म्हणाले.












