Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • ऐन निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जोरदार इनकमिंग
Pune

ऐन निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जोरदार इनकमिंग

Ajit Pawar's political entry into the Nationalist Congress Party

Ajit Pawar NCP incoming leaders : राज्यात सध्या महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. आज अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता. राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान होणार असून १६ जानेवारी रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. मात्र, त्यापुर्वीच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला मोठी लाॅटरी लागलीय. ऐन निवडणुकीच्या तोंडावर आज पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते जोरदार इनकमिंग झालंय. त्यामुळे ही राष्ट्रवादी पक्षासाठी मोठी शुभवार्ता आहे. त्यामुळे ही निवडणूक दादांच्या राष्ट्रवादीला सोपी जाणार का? किंवा पक्षात प्रवेश केलेला पदाधिकाऱ्यांचा किती फायदा होणार हे येणार काळच ठरवणार आहे.

हेही वाचा – मुंबई मराठी माणसाच्या हातात राहिली पाहिजे, त्यासाठी लढत आहे; आदित्य ठाकरे

अजित पवारांच्या हस्ते राष्ट्रवादीत जोरदार इनकमिंग

आज पुणे येथे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पुणे मनपाचे माजी स्थायी समिती अध्यक्ष आयाज बदरुद्दीन काझी, माजी नगरसेविका बतुल आयाज काझी, संजू अशोक धोत्रे, राहुल अशोक धोत्रे, अॅड. सुकेश पासलकर, गौरी संजय करंजकर, आबा सुतार, शिवम आबा सुतार, सौ. प्रज्ञा विलास कामठे-मगर आदी मान्यवरांसह विविध पक्षांतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. अजित पवार यांनी सर्वांचे राष्ट्रवादी परिवारात स्वागत करत त्यांना पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

ऐन निवडणुकीच्या काळात दादांच्या राष्ट्रवादीची पक्षाची ताकद वाढली

राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईतील कार्यालयातही पक्षात जोरदार इनकमिंग पहायला मिळाली आहे. पुणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक आणि मुस्लिम सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अॅड. अयुब इलाही बक्ष शेख यांनी आपल्या सहकाऱ्यांसह राष्ट्रवादी विचारांवर विश्वास ठेवत पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यामुळे ऐन निवडणुकीत पक्षाची ताकद वाढली आहे. याचा चांगला फायदा राष्ट्रवादीला होण्याची शक्यता आहे.

उद्या उमेदवारांची यादी आणि चिन्ह वाटप होणार..

उद्या ३ जानेवारीला महापालिका निवडणुकीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांचा यादी अंतिम यादी जाहीर होणार असून उमेदवारांना चिन्हांचे वाटप केले जाणार आहे. त्यानंतर प्रचाराला सुरुवात होणार आहे. नगर पंचायतीच्या निवडणुकीप्रमाणे राज्यातील बडे नेते यावेळीही जोरदार प्रचार करताना दिसणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक मंत्री आणि इतर नेते पायाला भिंगरी लावून प्रचार करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्यासह अनेक नेते प्रचाराला महाराष्ट्रात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

img

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts