Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • बदलापूर शाळेतील अत्याचार प्रकरणातील सह आरोपी आपटे याला भाजपकडून नगरसेवक पद
Top News

बदलापूर शाळेतील अत्याचार प्रकरणातील सह आरोपी आपटे याला भाजपकडून नगरसेवक पद

Badlapur School Abuse Case BJP Corporator

Badlapur School Abuse Case BJP Corporator : बदलापूरमधील शाळेत शिकणाऱ्या दोन चिमुरड्या मुलींचं लैंगिक शोषण करण्याच्या विकृत प्रकरणात सह आरोपी असलेल्या तुषार आपटे याला भाजपने बदलापूर-कुळगाव नगरपालिकेत स्वीकृत नगरसेवकपद दिल्यानंतर संतापाची प्रचंड लाट उसळली आहे. याविरोधात आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनीही आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजपने तुषार आपटे याच्या स्वीकृत नगरसेवकपदाचा तातडीने राजीनामा घेतला नाही तर येत्या 13 किंवा 14 जानेवारीला मनसे बदलापूरमध्ये मोर्चा काढेल आणि आंदोलन करेल, असा इशारा अविनाश जाधव यांनी दिला आहे.

बदलापूर शहरातील एका नामांकित शाळेत दोन वर्षांपूर्वी दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार प्रकरणामुळे संपूर्ण देश हादरला होता. एवढे होऊन संस्थेचे तत्कालीन सचिव तुषार आपटे यांनी पोलिसांत तक्रार दाखल करण्यास असमर्थता दाखवली होती. त्यामुळे त्यांच्यावर सहआरोप म्हणून गुन्हा नोंद करण्यात आला होता. आता याच तुषार आपटेला भाजपने स्विकृत नगरसेवकपदी संधी दिली आहे.

हेही वाचा – अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्याकडून पुण्याचा एकत्रित जाहीरनामा प्रसिद्ध

भाजपने तुषार आपटे यांना संधी दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या

शुक्रवारी कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या स्विकृत सदस्यांची निवड झाली. त्यात भाजपच्या दोन, शिंदेंच्या शिवसेनेच्या दोन तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या एका सदस्याची निवड करण्यात आली. यात भाजपने संधी दिलेल्या सदस्यांमध्ये तुषार आपटे यांचे नाव आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

बदलापूर प्रकरणातील सह आरोपी आपटेला ४८ तासांत जामिन

बदलापूर शहरासह राज्याला हादरवणाऱ्या दोन चिमुकल्या मुलांच्या लैंगिंक अत्याचार प्रकरणाने शाळेतील मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आणला होता. या प्रकरणी शाळेचे अध्यक्ष, सचिव यांनाही आरोपी करण्यात आले होते. बालकांच्या लैंगिक अत्याचार प्रकरणात तक्रार देण्यास असमर्थ ठरल्याच्या २१ (२) या कलमाखाली शाळेच्या संस्थाचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर या प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा तथाकथित चकमकीत मृत्यू झाला होता. या प्रकरणावरून मोठे राजकारणही रंगले होते. यात संस्थेचे सचिव तुषार आपटे हे ४४ दिवसांनी पोलिसांच्या हाती लागले होते. त्यांना त्यानंतर ४८ तासात जामिनही मिळाला होता. हे प्रकरण सध्या न्यायालयाच्या अधिन आहे.

भाजपने असंवेदनशीलतेचा कळस गाठला – सुप्रिया सुळे 

बदलापूर बाललैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीला स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी देऊन भाजपने आपले प्राधान्य कशाला आहे हे स्पष्ट केले आहे. बालके आणि महिलांच्या सुरक्षेला कोणत्याही सरकारचे प्राधान्य असायला हवे. परंतु भाजपाने पोस्को कायद्याचा ठपका असलेल्या व्यक्तीला स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी देऊन असंवेदनशीलतेचा कळस गाठला आहे. आम्ही याचा तीव्र शब्दांत निषेध करतो, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

img

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts