Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राज्य
  • ओडिशामध्ये चार्टर्ड विमान कोसळलं; सुदैवानं जीवितहानी नाही, मात्र पायलट गंभीर जखमी
Top News

ओडिशामध्ये चार्टर्ड विमान कोसळलं; सुदैवानं जीवितहानी नाही, मात्र पायलट गंभीर जखमी

Chartered Plane Crashes

Chartered Plane Crashes : ओडिशातील राउरकेला येथून भुवनेश्वरला जाणारं नऊ आसनी चार्टर्ड विमान शनिवारी दुपारी कोसळलं. इंडिया वन एअरच्या मालकीचं हे विमान राउरकेला येथून उड्डाण केल्यानंतर 10-15 किलोमीटर अंतरावर कोसळलं. सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पायलटसह सहा जण जखमी झाले आहेत आणि त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून अपघाताचं कारण सध्या अज्ञात आहे.

जखमींची प्रकृती स्थिर :

अधिकाऱ्यांच्या मते, भुवनेश्वरहून राउरकेलाला जाणारं नऊ आसनी विमान उड्डाणानंतर सुमारे 10 किलोमीटर अंतरावर कोसळलं. कॅप्टन नवीन कडंगा आणि कॅप्टन तरुण श्रीवास्तव यांच्यासह चार प्रवासी आणि दोन क्रू मेंबर्स होते. अपघातात सर्व सहा जण जखमी झाले आहेत. सर्वांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं आणि उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आलं. जखमींची प्रकृती सध्या स्थिर आहे.

घटनास्थळी पसरली घबराट :

पोलीस आणि स्थानिक प्रशासनाच्या मदतीनं अग्निशमन दलाच्या तीन पथकांना बचाव कार्यासाठी तैनात करण्यात आलं. अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा कमांड सेंटरनं विमान सुरक्षित करण्यासाठी आणि जखमींना त्वरित मदत देण्यासाठी घटनास्थळी मदत आणि बचाव कार्याचा समन्वय साधला. प्रत्यक्षदर्शींच्या मते, विमानानं आपत्कालीन लँडिंग करण्याचा प्रयत्न केला परंतु जलदाजवळ ते वेगानं खाली आलं, ज्यामुळं घटनास्थळी घबराट पसरली.

अपघाताटं कारण अस्पष्ट :

विमान दुपारी 1:15 वाजता राउरकेला इथं उतरणार होतं, परंतु त्यापूर्वीच हा अपघात झाला. अपघाताचं कारण सध्या तपासाधीन आहे. अपघाताचं कारण आणि परिस्थिती निश्चित करण्यासाठी अधिकाऱ्यांनी चौकशी सुरु केली आहे. चौकशी पूर्ण झाल्यानंतरच अपघाताच्या कारणाची अधिकृत पुष्टी शक्य होईल. दरम्यान, प्रशासन आणि संबंधित एजन्सी हाय अलर्टवर आहेत. या घटनेमुळं पुन्हा एकदा प्रादेशिक उड्डाणांमध्ये विमान वाहतुकीच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts