Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • जिकडे तिकडे पैसेच पैसे, डोंबिवलीत पैसे वाटपावरून भाजप शिंदे गटात तुफान राडा
Top News

जिकडे तिकडे पैसेच पैसे, डोंबिवलीत पैसे वाटपावरून भाजप शिंदे गटात तुफान राडा

BJP Shinde group clash in Dombivli

BJP Shinde group clash in Dombivli : राज्यात सध्या महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. प्रचार रंगात आल्याचं पहायला मिळत आहे. राज्य सरकारमध्ये महायुतीमध्ये असलेल्या भाजप- शिंदे गटाने अनेक ठिकाणी या महापालिका निवडणुकीसाठी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर आता डोंबिवलीमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिवसेना शिंदे गटाकडून भाजप कार्यकर्त्यावर पैसे वाटप केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर शिंदे गट आणि भाजपचे कार्यकर्ते यांच्यात तुफान राडा झाल्याचे समोर आलं आहे. डोंबिवलीत भाजपच्या कार्यकर्त्यांकडून प्रत्येक घरात एका-एका मतदाराला तीन हजार रुपयांचे पाकिटं वाटल्याचा आरोप शिंदे गटाकडून करण्यात आला आहे.

हेही वाचा – ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपला धक्का, ३ माजी नगरसेवकांचा शिंदे गटात पक्षप्रवेश

समोर आलेल्या माहितीनुसार, शिवसेनेचे उमेदवार नितीन पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी पैसे वाटणाऱ्यांना भाजपच्या तीन पुरुष कार्यकर्ते व एका महिला कार्यकर्त्याला रंगेहाथ हात पकडल्याची माहिती समोर येत आहे. त्यांच्याकडे जवळपास सत्तर ते ऐंशी हजाराची रोख रक्कम आढळून आल्याचा आरोप देखील शिंदे गटाकडून करण्यात आला आहे. अनेक पैशांची पाकिटं देखील तेथील एका घरात आढळून आले आहेत.

जिथे ही पैशांची पाकीटं आढळून आली तिथे शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी तुफान राडा केलाय. या तीनही कार्यकर्त्यांना त्यांनी पकडून ठेवलं होतं. घटनेची माहिती मिळताच निवडणूक आयोग आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यानंतर भाजपचे जिल्हाध्यक्ष नंदू परत देखील त्या ठिकाणी दाखल झाले, नंदू परत घटनास्थळी पोहोचताच पुन्हा एकदा भाजप आणि शिवसेना शिंदे गटात जोरदार राडा झाला. सध्या या परिसरात तणावाचं वातावरण आहे. निवडणूक आयोग आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

दरम्यान नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुदरम्यान देखील असाच प्रकार पहायला मिळाला होता. शिवसेना शिंदे गटाचे नेते निलेश राणे यांनी भाजप कार्यकर्त्याच्या घरावर पैसे वाटपाचा आरोप करत छापा टाकला होता, त्यावेळी देखील वातावरण चांगलंच तापल्याचं पहायला मिळालं.

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts