Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • दिग्गज बाॅलिवूड सुपरस्टार अभिनेत्री ठाकरे शिवसेनेच्या प्रचारासाठी मैदानात
Mumbai

दिग्गज बाॅलिवूड सुपरस्टार अभिनेत्री ठाकरे शिवसेनेच्या प्रचारासाठी मैदानात

Thackeray Shiv Sena Election Campaign

Bollywood Actress Campaigning for Thackeray Shiv Sena : महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचार सध्या अंतिम टप्प्यात आहे. सर्वच राजकीय पक्ष आणि अपक्ष उमेदवारांसाठी शेवटचे काही दिवस महत्त्वाचे ठरणार आहेत. शहरातील जवळपास सर्वच प्रभागांमध्ये सभा, पदयात्रा, कोपरा बैठक, घरोघरी भेटी, वाहन रॅली आणि रोड शो यांचा धुरळा उडाल्याचं चित्र पाहायला मिळाले. राजकीय पक्षांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. तर बॉलिवूडच्या मोठ्या सेलिब्रिटींनीही राजकीय प्रचारासाठी हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं. अभिनेत्री रवीना टंडननं नुकताच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उमेदवारांसाठी प्रचार केल्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आल्याचं दिसून आलं.

हेही वाचा – जिल्हा परिषदांचा धुरळा उडणार! १५ फेब्रुवारीपर्यंत निवडणुका पूर्ण करा, सुप्रीम कोर्टाचे आदेश

अभिनेत्री रवीना टंडन ही उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचा प्रचार करताना दिसून आली. रवीना टंडनचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यावेळी उमेदवाराच्या कामाचा आणि स्थानिक प्रश्नांचा उल्लेख करत मतदारांना मतदान करण्याचं आवाहन तिनं केलं. कला, संस्कृती आणि समाजाशी निगडित मुद्द्द्यांवर तिनं आपली भूमिका मांडल्याचं पाहायला मिळालं. सेलिब्रिटी प्रचारामुळं निवडणुकीच्या वातावरणात उत्साह वाढल्याचं दिसून आलं.

रोड शोमध्ये रवीना टंडननं घेतला सहभाग

मुंबईतील एका महत्त्वाच्या मतदारसंघात आयोजित करण्यात आलेल्या रोड शोमध्ये रवीना टंडननं सहभाग घेतला. यावेळी त्यांना पाहण्यासाठी चाहत्यांनी आणि शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली होती. “मशाल” चिन्हाचा प्रचार करत तिनं मतदारांना उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभं राहण्याचं आवाहन केलं.

महाराष्ट्राची संस्कृती आणि अस्मिता टिकवण्यासाठी शिवसेनेला साथ

प्रचारादरम्यान प्रसारमाध्यमांशी बोलताना रवीना टंडन हिनं म्हटलं की, “महाराष्ट्राची संस्कृती आणि अस्मिता टिकवण्यासाठी जे प्रामाणिक प्रयत्न सुरू आहेत, त्याला साथ देणं हे माझं कर्तव्य वाटतं. संकटकाळात ज्या पद्धतीनं काम झालं, ते कौतुकास्पद आहे.” रवीना टंडन ही केवळ एक अभिनेत्री नसून ती सामाजिक विषयांवरही आपलं मत ठामपणं मांडत असते. त्यामुळे तिनंउबाठा‘ गटाला दिलेला पाठिंबा हा तरुण आणि महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी महत्त्वाचा ठरू शकतो, अशी चर्चा राजकीय विश्लेषकांमध्ये रंगली आहे.

img

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts