गुन्हा

संगमनेर शहरात कोयता गँगची दहशत; तीन आरोपींना अटक

Police arrest three accused in Koyta gang terror case in Sangamner

Koyta gang terror in Sangamner : संगमनेर शहरातील जाणता राजा मैदानाजवळ हातात कोयता घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या तिघा आरोपींविरोधात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक समीर बावरकर पोलीस उप निरीक्षक श्रीकांत सावंत आणि गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनि या ठिकाणी सापळा लावून हे आरोपी गजाआड केले आहे.

गजबजलेल्या जाणता राजा मैदान परिसरात काही युवक हातात कोयता घेऊन नागरिकांमध्ये दहशत निर्माण करत असल्याची माहिती संगमनेर शहर पोलिसांना मिळाली. त्यानंतर संगमनेर शहर पोलिसांनी या ठिकाणी जाऊन यातील आरोपी समीर ज्ञानेश्वर सोनवणे (रा वेल्हाळे, ता संगमनेर) , सुदर्शन संजय नवले (रा मालदाड, ता संगमनेर) आणि यश दत्तू सोनवणे (रा वेल्हाळे , ता संगमनेर) या तिघा आरोपींना विरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक करण्यात आली आहे.

हे ही वाचा : बडतर्फ पूजा खेडकरचे हातपाय बांधून डांबून ठेवत चोरी

पोलीस कर्मचारी रामकिसन मुखरे यांच्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दहशत निर्माण करणाऱ्या तिघा आरोपीं विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्यांच्याकडून लोखंडी पात्याचा कोयता जप्त करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts