Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • धुळ्यात मुख्यमंत्र्यांच्या सभेपूर्वीच वाद ‘गर्दीसाठी पैसे दिले’; महिलांचा व्हिडिओ व्हायरल…
ताज्या बातम्या

धुळ्यात मुख्यमंत्र्यांच्या सभेपूर्वीच वाद ‘गर्दीसाठी पैसे दिले’; महिलांचा व्हिडिओ व्हायरल…

Women allege paid crowd ahead of CM rally in Dhule, video goes viral

Dhule CM rally controversy : राज्याचे मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत धुळे शहरात आज भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, सभा सुरू होण्यापूर्वीच एका व्हायरल व्हिडिओमुळे धुळ्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. सभेसाठी महिलांना पैसे देऊन आणल्याचा दावा या व्हिडिओमध्ये करण्यात आला असून, मिळणाऱ्या तुटपुंज्या मानधनावरून काही महिलांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे.

नेमका प्रकार काय?

सोशल मीडियावर सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये काही महिलांनी आरोप केला आहे की, मुख्यमंत्र्यांच्या सभेला उपस्थित राहण्यासाठी त्यांना 200 ते 250 रुपये रोज देण्याचे कबूल करण्यात आले होते. मात्र, कडक उन्हात कामधंदा सोडून सभेला येऊनही एवढ्याच तुटपुंज्या रकमेवर समाधान मानावे लागत असल्याने महिलांमध्ये तीव्र असंतोष दिसून येत आहे. नाश्ता आणि जेवणावरूनही नाराजी या महिलांचा आक्षेप केवळ पैशांपुरताच मर्यादित नाही. मूलभूत सुविधांबाबतही त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

हे ही वाचा : ‘सत्ता गेली तरी चालेल, पण….’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा जुना व्हिडिओ चर्चेत

या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये “आम्हाला 200-250 रुपये रोज सांगितले आहेत, पण त्यात जेवण तर दूरच, साधा नाश्ताही दिला जात नाही,” अशी व्यथा एका महिलेने मांडली आहे. सकाळपासून सभास्थळी थांबूनही खाण्यापिण्याची कोणतीही सोय नसल्याचा आरोप महिलांनी केला. हा व्हिडिओ व्हायरल होताच विरोधकांनी सत्ताधारी पक्षावर जोरदार टीका केली आहे.

“मुख्यमंत्र्यांच्या सभेला उत्स्फूर्त गर्दी होत नसल्याने आता पैशांचे आमिष दाखवून लोक जमवले जात आहेत,” असा आरोप स्थानिक विरोधी नेत्यांनी केला असून सभेसाठी आणलेल्या नागरिकांना किमान जेवण-पाणी देण्याइतकी माणुसकी तरी दाखवायला हवी होती, अशी टीकाही केली जात आहे.

आयोजकांची भूमिका काय?

दरम्यान, या व्हायरल व्हिडिओबाबत आयोजकांकडून अद्याप कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. काही कार्यकर्त्यांनी हा व्हिडिओ जाणीवपूर्वक सभेची बदनामी करण्यासाठी पसरवला जात असल्याचा दावा केला आहे. मात्र, प्रत्यक्ष महिलांनीच कॅमेऱ्यासमोर आपली नाराजी व्यक्त केल्याने सत्ताधारी पक्षाची चांगलीच कोंडी होताना दिसत आहे. या घटनेमुळे धुळ्यातील राजकीय वातावरण तापले असून, मुख्यमंत्र्यांच्या सभेभोवती आता या वादाची चर्चा अधिक रंगताना पाहायला मिळत आहे.

img

मी वेबसाईट साठी प्रभावी लिखाण करते. यासह अँकरिंगच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधण्याची आवड आहे. क्रिएटिव्ह कंटेन्ट लिहिणे, कार्यक्रमाचे निवेदन करणे ही माझी आवड असून मी पत्रकारिता आणि जनसंवाद या विषयात पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts