Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • मनोरंजन
  • साडे माडे तीन चित्रपटाचा टिझर प्रदर्शित; 30 जानेवारीला येणार प्रेक्षकांच्या भेटीला
मनोरंजन

साडे माडे तीन चित्रपटाचा टिझर प्रदर्शित; 30 जानेवारीला येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Teaser of Marathi film Sade Made Teen released ahead of January 30 release

Sade Made Teen film teaser : 2006 या वर्षी मराठी सिनेसृष्टीत गोंधळ घातलेला चित्रपट म्हणजे साडे माडे तीन. हा चित्रपट आता 2026 मध्ये धुमाकूळ घालायला तयार आहे. 2006 मध्ये आलेल्या कुरळे बंधूंचा हा चित्रपट आणि या चित्रपटात दर्शवलेल्या भन्नाट कॉमेडीने प्रेक्षकांचे मन जिकंले होते. एकही महिला नसलेल्या व्यक्तीच्या आयुष्यात अचानक महिलेची एंट्री झाल्यास होणारी फजिती आणि मजा दर्शवणारा हा चित्रपट आहे. आता या चित्रपटाचा टिझर रिलीज करण्यात आला असून 30 जानेवारी 2026 रोजी हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

टिझर प्रदर्शित

रतन, मदन आणि चंदन या कुरळे बंधूंची जोडी प्रेक्षकांना हसवण्यासाठी पुन्हा सज्ज आहे. साडे माडे तीन या चित्रपटाचा सिक्वेल 30 जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आता या चित्रपटाचा टिझर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे. सोश मीडियावर करण्यात आलेल्या पोस्टध्ये लिहिण्यात आलं आहे कि, कुरळे बंधूंच्या आयुष्यात तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे…. इथे अजूनही नियम एकच…! नो लेडीज नो मॅरेज, कारण हे आहे कुरळे गॅरेजपुन्हा एकदा साडे माडे तीन…… 30 जानेवारीपासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहातहा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धमाल करणार आहे. प्रेक्षकांची आवडती जोडी अशोक मामा, मकरंद अनासपुरे, आणि भरत जाधव हे तिघे परत एकत्र येणार आहे. या चित्रपटात सैराट फेम आर्ची कामिनीच्या भूमिकेत दिसणार आहे.

हे ही वाचा : क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम चित्रपटाने केली 3.90 कोटींची कमाई

रिंकू राजगुरू कामिनीच्या भूमिकेत

साडे माडे तीन या चित्रपटाच्या टिझर मध्येशोमामा, मकरंद अनासपुरे, भरत जाधव हे रत्न मदन आणि चंदन च्या भूमिकेत असणार आहे. त्यांच्या आयुष्यात कामिनी आल्यामुळे होणारी फजिती आणि मजेदार किस्से आपल्याला ऐकायला मिळतील. चित्रपटात कामिनीची भूमिका अभिनेत्री रिंकु राजगुरू साकारणार असून कुरळे ब्रदर्सच्या गँगमध्ये कामिनीची एन्ट्री झाल्यामुळे तिघांमध्ये उडालेला गोंधळ अनुभवायला मिळेल.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ankush Chaudhari (@ankushpchaudhari)

कोण कोण कलाकार असणार

प्रदर्शित झालेल्या टीझरची सुरुवात रिंकू राजगुरूच्या आवाजाने होते. त्यानंतर रतन मदन चंदन आणि कामिनीची एंट्री होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन अंकुश चौधरी करणार असून निर्माता म्हणून स्वाती खोपकर,  सुधीर कोलते, उषा काकडे, पुष्कर यावलकर, आणि निनाद बत्तीन हे काम पाहत आहेत. तर स्मिथ पीटर तेलगोटे सहाय्यक निर्माता म्हणून काम पाहत आहे. या चित्रपटात मुख्य भूमिकेत ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, मकरंद अनासपुरे, भरत जाधव आणि रिंकू राजगुरू झळकणार असून  संकेत पाठक, समृद्धी केळकर आणि संजय नार्वेकर हे प्रमुख भूमिकेत आहे.

img

मी वेबसाईट साठी प्रभावी लिखाण करते. यासह अँकरिंगच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधण्याची आवड आहे. क्रिएटिव्ह कंटेन्ट लिहिणे, कार्यक्रमाचे निवेदन करणे ही माझी आवड असून मी पत्रकारिता आणि जनसंवाद या विषयात पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts