Dynastic politics in elections : राजकारण आणि घराणेशाही हे चालत आलेले जुनेच समीकरण पुणे महानगरपालिका निवडणुकीत पुन्हा एकदा ठळकपणे दिसून येत आहे. विविध राजकीय पक्षांनी उमेदवारी जाहीर करताच महापालिका निवडणुकीच्या रिंगणात नातेसंबंधांतील उमेदवारांची लक्षणीय संख्या समोर आली आहे. यामुळे संधी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना की घरातील सदस्यांनाच? असा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
पुणे महापालिकेत पती-पत्नी, आई-मुलगा, नणंद-भावजय, वडील-मुलगा, भाऊ-भाऊ, मामा-भाचे तसेच सासरा-जावई अशा १२ हून अधिक नातेसंबंधातील जोड्या विविध पक्षांकडून उमेदवारी घेऊन निवडणूक मैदानात उतरल्या आहेत. काही ठिकाणी या जोड्या एकाच प्रभागातून, तर काही ठिकाणी वेगवेगळ्या प्रभागांतून निवडणूक लढवत असून महापालिकेत पोहोचण्यासाठी चुरशीचा संघर्ष करीत आहेत.
हेही – धक्कादायक! माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी स्टेजवर आली चक्कर
राजकीय पक्षांकडून अनुभव, ओळख आणि जिंकण्याची क्षमता या कारणांचा आधार घेत उमेदवारी दिली जात असल्याचे सांगितले जात असले, तरी दुसरीकडे निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलले जात असल्याच्या तक्रारीही उघडपणे पुढे येत आहेत. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत विकासाच्या मुद्द्यांसोबतच घराणेशाही विरुद्ध सर्वसामान्य कार्यकर्ते हा मुद्दा देखील महत्त्वाचा ठरण्याची चिन्हे आहेत.
नातेसंबंधांतील उमेदवारांची थोडक्यात माहिती..
पती – पत्नी
प्रभाग क्रमांक ३ – ऐश्वर्या पाटील-पठारे (भाजप)
प्रभाग क्रमांक ४ – सुरेंद्र पठारे (भाजप)
प्रभाग क्रमांक ६ – संजय भोसले (भाजप)
प्रभाग क्रमांक १३ – अश्विनी भोसले (भाजप)
प्रभाग क्रमांक २२ – अविनाश बागवे, इंदिरा बागवे (काँग्रेस)
आई – मुलगा
प्रभाग क्रमांक १८ – रत्नप्रभा जगताप, प्रशांत जगताप (काँग्रेस)
प्रभाग क्रमांक ३४ – राधिका गिरमे, नीलेश गिरमे (शिवसेना)
प्रभाग क्रमांक २३ – प्रतिभा धंगेकर (शिवसेना)
प्रभाग क्रमांक २४ – प्रणव धंगेकर (शिवसेना)
भाऊ – भाऊ
प्रभाग क्रमांक ११ – हर्षवर्धन मानकर (राष्ट्रवादी काँग्रेस)
प्रभाग क्रमांक २५ – राघवेंद्र मानकर (भाजप)
नणंद – भावजय
प्रभाग क्रमांक २७ – अक्षदा गदादे (राष्ट्रवादी काँग्रेस – शप)
प्रभाग क्रमांक २८ – प्रिया गदादे (राष्ट्रवादी काँग्रेस)
मामा-भाचे
प्रभाग क्रमांक २२ – रफिक शेख, दिलशाद शेख (काँग्रेस)
सासरा – जावई
प्रभाग क्रमांक ३४ – बापूसाहेब पोकळे (राष्ट्रवादी काँग्रेस)
प्रभाग क्रमांक ३४ – राजू लायगुडे (भाजप)












