Election cancelled CM statement : उद्या नगर परिषद आणि नगर पंचायतचा निवडणूक कार्यक्रम राज्यात होणार आहे. अशातच निवडणूक आयोगाने 14 जिल्ह्याचा निवडणूक कार्यक्रम रद्द केल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक आयोगावर ताशेरे ओढले आहे. त्यांनी निवडणूक आयोगाच्या विरोधात स्पष्ठपणे वक्तव्य केले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर टीका करत निवडणूक आयोगाने ऐन वेळेवर काही जिल्ह्यातील नगर परिषद आणि नगर पंचायतच्या निवडणूका पुढे ढकलल्याने टीका केली आहे. ते म्हणालेत कि निवडणूका रद्द करणे अत्यंत चुकीचे आहे. निवडणूक आयोग कुठला कायदा काढत आहे आणि कोणाचा सल्ला घेत आहे मला माहित नाही असेही ते म्हणाले.
फडणवीस विरोधकांवर बरसले
नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणूका या कार्यकर्त्याच्या आहेत. जे कार्यकर्ते आपल्यासाठी निवडणुकीत फिरतात, त्यांच्यासाठी फिरायचं नाही, त्यांना मदत करायची नाही हे अयोग्य आहे. त्यांना माहित आहे, या निवडणुकीत ते हरणार आहेत, म्हणून त्यांना पराभवाचा शिक्का माथी लावून घ्यायचा नसल्याचे वक्तव्य उद्धव ठाकरे आणि शरद पवार प्रचारात दिसत नाही या प्रश्नांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
हे ही वाचा : ऐन निवडणुकांच्या तोंडावर या जिल्ह्यातील निवडणूक कार्यक्रम लांबणीवर; या दिवशी होणार निवडणूक
निवडणूक आयोगावर देखील स्पष्ठ वक्तव्य
निवडणूक आयोगाने अचानक निवडणूक रद्द केल्या यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले कि, निवडणूक आयोगाने कायद्याचा चुकीचा अर्थ लावला असून या निवडणुका रद्द करणं अत्यंत चुकीचे आहे. कोणीतरी कोर्टात जाईल आणि निवडणूक पुढे ढकलली जाईल असं आजपर्यंत कधीही झले नव्हते. निवडणूक आयोग कुठला कायदा काढत आहे, कोणाचा सल्ला घेत आहे हे मला माहित नाही. माझा जेवढा कायद्याचा अभ्यास आहे, अशा पद्धतीने निवडणुका पुढे ढकलता येत नाहीत.
निवडणूक आयोगाला एक रिप्रेझेंटेशन देऊ
निवडणूक घेण्याचा त्यांना अधिकार असून कायदेशीररित्या निवडणूक आयोगाने निवडणुका पुढे ढकलणे चुकीचे आहे. ज्या उमेदवारांनी प्रामाणिकपणे कार्य केले, ज्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली त्यांच्यासाठी हे अत्यंत अयोग्य आहे. या संदर्भात आम्ही निवडणूक आयोगाला एक रिप्रेझेंटेशन देणार असल्याचे वक्तव्य त्यांनी केले.












