Election schedule postponed : नगरपरिषद आणि नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी अवघा 1दिवस उरला आहे. सर्वत्र निवडणुकांचे वातावरण, प्रचार, प्रसाराच्या तोफा भन्नाट सुरु आहे. आणि या तोफा उद्या थंडावताना दिसतील. आणि मतदानाला परवा सुरुवात होताना दिसेल. सर्वत्र मतदानाची रणधुमाळी सुरु असताना काही नागरपालिका आणि नगरपरिषदेच्या निवडणुकांना ब्रेक लागल्याची माहिती समोर आली आहे.
या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ज्या नगरपालिका आणि नगरपरिषदेच्या निवडणूक [पुढे धाकारल्यात आल्या आहेत त्यामध्ये अहिल्यानगर मधील 12 पैकी 4 नगरपरीषदेचा समावेश आहे. धाराशिवमधील तीन प्रभागांची निवडणूक देखील लांबणीवर असणार आहे. कारण याठिकाणी होणाऱ्या निवडणूका काही कारणाने पुढे ढकलण्यात आल्या आहेत. यामुळे काही ठिकाणी उमेदवार आणि कार्यकर्त्यांच्या उत्साहावर पाणी फेरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. परंतु राज्य निवडणूक आयोगाने या नगरपरिषदेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.
अहिल्यानगर येथील कोपरगाव, देवळाली प्रवरा, नेवासा आणि पाथर्डी या चार ठिकाणी होणाऱ्या निवडणुका पुढे ढकलन्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या ठिकाणी होणाऱ्या निवडणूका पुढे ढकलण्याचे कारण म्हणजे नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराबद्दल आणि सात नगरसेवक पदाच्या उमेदवाराबाबत कोर्टात अपिल असल्याची माहिती उघड झाली आहे. म्हणूनच मतदान पुढे ढकलण्यात आले आहे.
तसेच या नगरपरिषद आणि नगरसेवक पदाच्या मतदान प्रक्रियेतून 10 डिसेंबर पर्यंत माघार घेण्यासाठी मुदत देण्यात येणार आहे, आणि 20 डिसेंबर रोजी मतदान आणि 21 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार असल्याची माहिती मिळली आहे.
हे ही वाचा : Maharashtra Liquor Ban : महाराष्ट्रात तीन दिवस मद्यविक्री असणार बंद
धाराशिवमधील तीन प्रभागांची निवडणूक केव्हा?
धाराशिव शहरातील तीन प्रभाग न्यायालयीन प्रक्रियेत अडकल्याचे वृत्त समोर आले आहे. त्यामुळे या तीन प्रभागांचे मतदान पुढे ढकलण्यात आले आहे. या शहरातील प्रभाग 2 अ 7 ब आणि 14 ब या प्रभागातील उमेदवारांवर आक्षेप घेण्यात आल्याने हि न्यायालयीन प्रक्रिया अद्याप सुरु आहे. त्यांची मतदान प्रक्रिया 20 डिसेंबर रोजी होणार आहे.
धाराशिव सोबतच सातारा जिल्ह्यातील 9 नगरपालिकांपैकी 2 नगरपालिकेचा निवडणूक कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे. तर फलटण आणि महाबळेश्वर येथील नगरपरिषद निवडणूक रद्द करून पुढे ढकलण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
निवडणूक का पुढे ढकलली जाते
अपिलाचा निकाल उशिरा लागल्या नंतर, लेखी निकाल प्राप्त न होता, काही प्रकरणी अपिलांची सुनावली झाली नसताना, किंवा काही प्रकरणी न्यायालयाच्या निकालाच्या अधीन राहून या सारख्या अनेक कारणाने निवडणूक पुढे ढकलली जाऊ शकते.
अवघ्या तीन दिवसात होणाऱ्या निवडणूकांसाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांनी उमेदवारांना नामनिर्देशित पत्र परत घेण्यासाठी आवश्यक कालावधी न दिल्याने चिन्हांचे वाटप केल्यामुळे उच्च न्यायालयाने हा निर्णय घेतला आहे. यामुळे दोन्ही नगर परिषदेचा कार्यक्रम पुन्हा घेण्याचे निर्देश देण्यात आले असून नवीन सुधारित कार्यक्रम जाहीर केला आहे.
कधी होणार निवडणूक
या दोन्ही नगरपालिकेचा निवडणूक कार्यक्रम 4 डिसेंबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे. त्यानुसार ज्या उमेदवाराला नामनिर्देशित पत्र मागे घ्यायचे आहे त्यांना 10 डिसेंबर रोजी 3 वाजेपर्यंत कालावधी देण्यात येणार आहे. त्यानंतर 20 डिसेंबर रोजी मतदान, 21 डिसेंबर मतमोजणी आणि 23 डिसेंबर रोजी निकाल जाहीर करण्यात येईल. याबाबत जिल्हाधिकारी यांनी या आशयाचे पत्र पारित केले आहे.












