लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय
Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.
Navi Mumbai reserved plot sale dispute : नवी मुंबईच्या विकासासाठी आरक्षित भूखंड बिल्डरांना दिल्यावरून नवी मुंबईत वनमंत्री गणेश नाईक आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील शीत युद्ध पुन्हा एकदा रंगलेले पहायला मिळत आहे. नवी मुंबई महापालिका प्रशासनाने शाळा, उद्याने आणि सामाजिक विकासासाठी सिडकोकडे मागितलेले भूखंड दलालांनी नगरविकास खात्याच्या मदतीने बिल्डरांच्या घशात घातले आहेत.
या किळसवाण्या प्रकाराची मला लाज वाटते. ज्या मंत्रिमंडळात मी आहे त्याच मंत्रिमंडळातील नगरविकास खात्याच्या लोकांनी हा कर्मदरिद्रीपणा केला आहे. जनतेला जे हवे ते मिळवून देऊ शकलो नाही तर मंत्रीपद चाटायचे आहे काय? असा संताप वनमंत्री गणेश नाईक यांनी व्यक्त करत एकनाथ शिंदे यांच्यावर थेट हल्लाबोल केलाय.
प्लॉट विकले त्यावेळी मंत्रिपद चाटत होते का?
गणेश नाईक यांच्या टिकेला शिवसेना शिंदे गटाचे उपनेते विजय चौगुले यांनी प्रतिउत्तर देत गणेश नाईक 15 वर्षं पालकमंत्री असताना त्यांनी किती प्लॉट विकले त्यावेळी मंत्रिपद चाटत होते का? असा थेट सवाल उपस्थित केलाय. एकनाथ शिंदे यांचं नाव घेतल्याशिवाय टीआरपी मिळत नसल्याने ते आरोप करतायत अशी प्रतिक्रिया चौगुले यांनी व्यक्त केलेय.
नवी मुंबईकरांचे मूलभूत प्रश्न बाजूला राहू नये
एकूणच वनमंत्री गणेश नाईक आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील राजकीय वर्चस्वाची लढाई रोज नव्या आरोप प्रत्यारोपाने रंगत असूली तरी यामुळे नवी मुंबईकरांचे मूलभूत प्रश्न बाजूला राहू नयेत एवढीच अपेक्षा नवी मुंबईकर नागरिक करत आहेत.
प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.