पटना : 25 वर्षीय युवा लोकगायिका मैथिली ठाकूर मंगळवारी भारतीय जनता पक्षात (भाजपा) सामील झाली. पक्षाच्या सूत्रांनुसार, ती दरभंगाच्या अलीनगर मतदारसंघातून बिहार विधानसभा निवडणूक लढवू शकते. परिणामी, अलीनगर मतदारसंघातून विद्यमान आमदार मिश्रीलाल यादव यांचं तिकीट कापलं जाणं जवळजवळ निश्चित आहे. शिवाय, मैथिली ठाकूरचा मोठा सोशल मीडिया चाहता वर्ग आणि मिथिला प्रदेशात लोकप्रियता पाहता भाजपा त्यांना आपल्या प्रचाराचा चेहरा बनवू शकते. जर मैथिली ठाकूरला तिकिट मिळालं आणि तीनं निवडणुक जिंकली तर बिहारच्या लोकसंस्कृतीशी संबंधित प्रसिद्ध गायिका थेट राजकीय क्षेत्रात उतरण्याची ही पहिलीच वेळ असेल.
काय म्हणाली मैथिली ठाकूर :
भाजपा सामील झाल्यानंतर मैथिली म्हणाली, “एनडीए सरकारच्या काळात बिहारची प्रगती आणि विकास होईल. महिला सक्षमीकरण, गरिबांचं कल्याण, तरुणांचं भविष्य आणि शेतकऱ्यांचं कल्याण हे आमच्या सरकारचं प्राधान्य आहे. आम्ही या प्राधान्यांना लक्षात घेऊन मतदारांशी संपर्क साधू.” पक्षात सामील झाल्यानंतर मैथिली ठाकूर म्हणाली की त्या पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून प्रभावित झाल्या आहेत आणि नितीश कुमार यांच्या प्रेरणेनं त्यांना पाठिंबा देण्यास तयार आहेत. “राजकीय पक्षात सामील होणं म्हणजे मी नेता होण्यासाठी इथं आलेली नाही. मी समाजाची सेवा करण्यासाठी इथं आली आहे. मी मिथिलाची मुलगी आहे आणि माझं हृदय मिथिलामध्ये आहे,” असंही तिनं म्हटलं. बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजपानं दुसरी यादी जाहीर केली. यात अलीनगर विधानसभा मतदारसंघातून 25 वर्षीय मैथिली ठाकुरला तिकिट देण्यात आलं आहे.
#WATCH भाजपा में शामिल होने के बाद मैथिली ठाकुर ने कहा,”बिहार के मुख्यमंत्री नीतीश कुमार से प्रेरित होकर आज मैं उनके सहयोग के लिए यहां पर खड़ी हूं। मैं समाज सेवा के लिए आई हूं और उनके विचारधारा को जन-जन तक पहुंचाने आई हूं। मैं मिथिला की बेटी हूं और मेरा प्राण मिथिलांचल में बसता… https://t.co/lGXopVXdlK pic.twitter.com/R9sKha8nrP
— ANI_HindiNews (@AHindinews) October 14, 2025
मैथिली कोण आहे? :
मैथिली ही बिहारची एक प्रसिद्ध गायिका आहे. ती दरभंगाची रहवासी आहे. ती तिच्या मैथिली लोकसंगीतासाठी ओळखली जाते आणि परदेशात मैथिली संगीत सादर करते. 25 वर्षीय गायिका मिथिला संस्कृतीसाठी प्रसिद्ध आहे. मैथिलीला लहानपणापासूनच गाण्याची आवड आहे. ती एक पार्श्वगायिका आहे आणि शास्त्रीय संगीताचं प्रशिक्षण घेतलं आहे. तिनं अनेक भाषांमध्ये गायन केलं आहे. तिचे वडील रमेश ठाकूर आणि आई भारती ठाकूर मैथिली संगीतकार आहेत. दोघंही संगीत शिक्षक म्हणून काम करतात. मैथिलीचे दोन भाऊ आहेत, जे संगीतात करिअर करत आहेत. सर्व मुलांना त्यांच्या आजोबा आणि वडिलांनी संगीताचे प्रशिक्षण दिलं आहे. तिन्ही भावंडांनी हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत तसेच हार्मोनियम आणि तबल्याचं प्रशिक्षण घेतलं आहे.