Controversy within the Mahavikas Aghadi : महाविकास आघाडी मधील बिघाडी आता हळुहळु वर येत आहे. काँग्रेसच्या जेष्ठ आमदारांना शिवसेना ठाकरे गटाच्या ज्युनिअर आमदारांच्या पाठीमागे बसावे लागत असल्याची खंत काँग्रेस आमदारांनी विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर याच्यापुढे मांडली आहे. महाराष्ट्रात 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महाविकास आघाडी स्थापन करण्यात आली. यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि ठाकरेंची शिवसेना यांनी एकत्र येत सरकार स्थापन केलं. त्यानंतर अद्याप ही महाविकास आघाडी आहे. मात्र, आता या आघाडी बिघाडी होणार असल्याचे चिन्ह दिसत आहेत.
महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेना-भाजपची हिंदुत्वाच्या आधारावर तर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची धर्मनिरपेक्षता या आधारावर युती होती. आजही ती आहे. पण मागच्या चार वर्षात महाराष्ट्राचं राजकारण मोठ्या प्रमाणत बदललं. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले. एक गट सत्ताधारी भाजपसोबत दुसरागट विरोधी पक्षामध्ये अशी स्थिती आहे. महाराष्ट्रात सध्या महायुतीचं सरकार आहे. या महायुतीमध्ये भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस असे तीन पक्ष सोबत आहेत. दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा गट महाविकास आघाडी म्हणून एकत्र आहे. महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि काँग्रेस मित्रपक्ष आहेत.
हेही वाचा – कारवाई होणार ? लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या सरकारी महिलांवर होणार कारवाई; वसुलीचे देखील आदेश
विधीमंडळातील आसन व्यवस्थेवरून ठाकरे गट व काँग्रेसमध्ये वाद
विधिमंडळात आसन व्यवस्थेवरुन या मैत्रीला ग्रहण लागलं आहे. नागपूरमध्ये महाराष्ट्र विधानसभेचं हिवाळी अधिवेशन सुरु आहे. आज अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. विधीमंडळातील आसन व्यवस्थेवरून ठाकरे गट व काँग्रेसमध्ये वाद झाल्याची माहिती आहे. काँग्रेस आमदारांनी या संदर्भात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली. विधिमंडळात ठाकरे गटाच्या 20 आमदारांमध्ये 14 आमदारांची पुढील जागेत बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. काँग्रेसच्या 16 आमदारांपैकी फक्त ४ आमदारांना पुढे जागा दिली आहे. हे काँग्रेस आमदारांना पटलेलं नाही. त्यांना सहन होत नाहीय.
काँग्रेसच्या ज्येष्ठ आमदारांना ठाकरे गटाच्या कनिष्ठ आमदारांमागे बसावे लागत
सिनियर असूनही काँग्रेसच्या ज्येष्ठ आमदारांना ठाकरे गटाच्या कनिष्ठ आमदारांमागे बसावे लागत आहे. म्हणून त्यांनी आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली. आता यावर काय तोडगा निघतो? ते कळेलच. विधानसभेतील संख्याबळ पाहिलं, तर महाविकास आघाडीचे फक्त 46 आमदार आहेत. यात शिवसेनेचे सर्वाधिक 20, काँग्रेसचे 16 आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे 10 आमदार आहेत. महायुतीच संख्याबळ 240 पेक्षाही जास्त आहे.












