district-wise political update Maharashtra : सध्या राज्यात आज सर्वत्र नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकांची मतमोजणी सुरु आहे. आता 242 नगर परिषद आणि 46 नगर पंचायतीचे निकाल जाहीर होणार आहे. काही वर्षांपासून या निवडणूक रखडल्या होत्या. अखेर या निवडणूक पार पडल्या असून आता मतमोजणीची आकडेवारी समोर येत आहे.
या नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुका चार वर्षांपासून लांबल्या होत्या. त्यानंतर निवडणूक आयोगाने 2 डिसेंबर रोजी स्थानिक स्वराज्य संथांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुषंगाने मतदान 2 डिसेंबर रोजी पार पडले. तर 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार होती. परंतु निवडणूक आयोगाने काही जिल्ह्यातील निवडणूक कार्यक्रम निवडणुकीत उभ्या असलेल्या उमेदवारांवर कोर्टात सुरु असलेल्या केसेसमुळे पुढे ढकलल्या होत्या. आणि मतमोजणीची तारीख देखील लांबणीवर टाकली होती. त्यानंतर 20 डिसेंबर रोजी उर्वरित जिल्ह्यात मतदान कार्यक्रम जाहीर करण्यात आल्या. आणि 21 डिसेंबर म्हणजे आज या निवडणुकीच्या मतमोजणीचा कार्यक्रम पार पडला. त्यानुसार आता मतमोजणी सर्व जिल्ह्यांमध्ये सुरु असून जाणून घेऊया प्रत्येक जिल्ह्यातील आताची ताजी अपडेट्स.
सिंधुदुर्ग
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली येथे नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार संदेश पारकर 145 मतांनी विजयी ठरले आहे. तर संदेश पारकर-समीर नलावडे यांच्यात चुरस पाहायला मिळत आहे. तर सिंधुदुर्ग येथील मालवण मध्ये शिंदेच्या शिवसेनेच्या नगराध्यक्ष उमेदवार ममता वराडकर 1 हजार 19 मतांनी विजयी झाल्या आहे. याठिकाणी भाजप चा पराभव झाल्याचे पाहायला मिळाले. तर सावंतवाडीत भाजपच्या श्रद्धाराजे भोसले ७४५ मतांनी विजयी ठरल्या आहे.
हे ही वाचा : अकोला जिल्हा 5 नगरपरिषद आणि 1 नगरपंचायत नगराध्यक्ष उमेदवार, तर भंडाऱ्यात यांची प्रतिष्ठा पणाला
गंगापूर
गंगापूर मध्ये आमदार प्रशांत बंब यांना मोठा धक्का बसला असून आमदार सतीश चव्हाण यांनी बाजी मारली आहे. तसेच फुलंब्री मध्ये भाजपच्या आमदार अनुराधाताई चव्हाण, मंत्री अतुल सावे यांना मोठा धक्का बसला असून याठिकाणी ठाकरे गटाचे उमेदवार विजयी झाले आहेत. याशिवाय खुलताबाद मध्ये काँग्रेसने खाते उघडले असून स्थानिक आमदार प्रशांत बंब आता पराभूत झाल्याचे चित्र दिसत आहे. तर राष्ट्रवादी अप मध्ये संजय जाधव विजयी ठरले आहे.
छत्रपती संभाजीनगर
छत्रपती संभाजीनगर येथील सिल्लोड मध्ये शिवसेनेचे समीर सत्तार आघाडीवर आहेत. तर कन्नडमध्ये काँग्रेसचे शेख फरीन आघाडीवर आहे. पैठणमध्ये भाजपाचे उमेदवार दिनेश परदेशी 6 हजार पेक्षा जास्त मतांनी विजयी ठरले आहे. याशिवाय शिवसेनेच्या विद्या कावसानकर आघाडीवर आहे. गंगापूरमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे संजय जाधव आघाडीवर आहे. खुलताबादमध्ये काँग्रेसचे अमिर पटेल विजयी ठरले असून वैजापूरमध्ये भाजपचे दिनेश परदेशी 6 हजार पेक्षा जास्त मतांनी विजयी फुलंब्री पंचायतमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे राजेंद्र ठोंबरे 1797 मतांनी विजयी ठरल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
कोल्हापूर
कोल्हापुरातल्या पाचव्या नगर परिषदेचा निकाल हाती आला आहे. गडहिंग्लज नगरपालिकेवर राष्ट्रवादीने झेंडा फडकावला आहे. राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार महेश तुरबतमट हे 4705 मतांनी विजयी ठरले असून राष्ट्रवादीने 17 जागांवर विजय मिळवला आहे. तर विरोधी जनता दल, जनसुराज्य आणि भाजपला फक्त पाच जागांवर समाधान मानायची वेळ आली आहे. याशिवाय हसन मुश्रीफ यांचा कागल नंतर गडहिंग्लजमध्ये मोठा विजय झाला आहे.












