Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राज्य
  • नितिश कुमारांनी दहाव्यांदा घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ; एनडीएचं शक्तीप्रदर्शन
Top News

नितिश कुमारांनी दहाव्यांदा घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ; एनडीएचं शक्तीप्रदर्शन

Oath ceremony event where Nitish Kumar is taking oath as Chief Minister during the NDA show of strength

Nitish Kumar tenth time oath : बिहारचे सर्वात जास्त काळ मुख्यमंत्री राहिलेले आणि जनता दल (युनायटेड) चे राष्ट्रीय अध्यक्ष नितीश कुमार यांनी गुरुवारी 10व्यांदा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. पाटण्यातील ऐतिहासिक गांधी मैदानावर झालेल्या एका भव्य समारंभात राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी नितीश कुमार यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. 74 वर्षीय नितीश कुमार पहिल्यांदा 2000 मध्ये मुख्यमंत्री झाले, जरी त्यांचं सरकार फक्त आठ दिवस चाललं. त्यानंतर त्यांनी 2005 ते 2014 पर्यंत सतत मुख्यमंत्री म्हणून काम पाहिलं. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाच्या खराब कामगिरीनंतर, नितीश कुमार यांनी राजीनामा दिला परंतु काही महिन्यांनंतर ते पुन्हा सत्तेत आले. जानेवारी 2024 मध्ये, ते एनडीएमध्ये परतले आणि 9 व्यांदा मुख्यमंत्रीपद स्वीकारलं आणि आज त्यांनी 10 व्यांदा शपथ घेतली.

 

सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा उपमुख्यमंत्री :

या प्रसंगी भाजपा नेते सम्राट चौधरी आणि विजय कुमार सिन्हा यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली हे लक्षात घेण्यासारखं आहे. चौधरी आणि सिन्हा दोघांनीही मागील सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळली होती. यावेळी विजय चौधरी, बिजेंद्र प्रसाद यादव, श्रवण कुमार, मंगल पांडे, दिलीप जयस्वाल आणि अशोक चौधरी यांच्यासह अनेक आमदारांनाही मंत्रीपदाची शपथ देण्यात आली. रामा निषाद, श्रेयसी सिंह, लेसी सिंह आणि जामा खान यांच्यासह इतरांनाही मंत्रीपदाची शपथ देण्यात आली. नितीश कुमार यांच्या 10 व्यांदा मुख्यमंत्रीपदाच्या निवडीबद्दल त्यांचे पुत्र निशांत कुमार म्हणाले, “मी माझ्या वडिलांना 10व्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याबद्दल अभिनंदन करतो. जनतेनं आम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त दिलं आहे. मी जनतेचे आभार मानतो आणि त्यांचं अभिनंदन करतो.”

हे हि वाचा : बिहारमध्ये दसवी बार नितिश कुमार! सोहळ्याला पंतप्रधानांसह अमित शाह राहणार हजर

शपथविधी सोहळ्याला अनेक प्रमुख नेते उपस्थित :

या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याव्यतिरिक्त, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि एनडीएचे अनेक वरिष्ठ नेते शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते. याशिवाय आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री हजर होते. यासह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव, उत्तराखंडचे पुष्करसिंग धामी, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता, आंध्र प्रदेशचे चंद्राबाबू नायडू, राजस्थानचे भजनलाल शर्मा उपस्थित होते.

img

मी वेबसाईट साठी प्रभावी लिखाण करते. यासह अँकरिंगच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधण्याची आवड आहे. क्रिएटिव्ह कंटेन्ट लिहिणे, कार्यक्रमाचे निवेदन करणे ही माझी आवड असून मी पत्रकारिता आणि जनसंवाद या विषयात पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts