Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • महाराष्ट्रातील जनतेच्या सेवेत सदैव अग्रभागी राहणारे मेहनती व्यक्तिमत्त्व…; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाहिली उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली
Top News

महाराष्ट्रातील जनतेच्या सेवेत सदैव अग्रभागी राहणारे मेहनती व्यक्तिमत्त्व…; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाहिली उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली

pm modi tribute to dcm ajit pawar

Pm modi tribute to DCM Ajit Pawar  : आज संपूर्ण महाराष्ट्रासाठी काळा दिवस आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री ताठ राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचा लँडिंगवेळी अपघा झाला. या अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवारांसह 4 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली. या दुर्दैवी घटनेने बारामतीसह संपूर्ण महाराष्ट्र हळहळला आहे. सर्वत्र दुःखद वातावरण निर्माण झाले असून राजकीय वर्तुळात दुःख व्यक्त करण्यात ये आहे.

संपूर्ण महाराष्ट्राला हवेहवेसे वाटणारे धडाडीचे नेते म्हणून अजित पवार यांची ओळख आहे. आज सकाळी बारामती येथे जात असताना विमान लँडिंगवेळी त्यांच्या प्रायव्हेट विमानाचा अपघात झाला. या अपघातात दादांचे निधन झाले असून त्यांच्या कुटुंबियांसह राजकीय नेते आणि संपूर्ण महाराष्ट्राला अश्रू अनावर झाले. राजकीय नेत्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट शेअर करत राज्याच्या लाडक्या उपमुख्यमंत्री अजित दादांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाहिली श्रद्धांजली

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. अजित पवार जी हे जनतेशी घट्ट नाते असलेले, तळागाळाशी मजबूत नाळ असलेले लोकनेते होते. महाराष्ट्रातील जनतेच्या सेवेत सदैव अग्रभागी राहणारे एक मेहनती व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांना व्यापक आदर होता. प्रशासकीय बाबींची त्यांना सखोल जाण होती. गरीब आणि वंचितांच्या सक्षमीकरणासाठीची त्यांची तळमळ विशेष उल्लेखनीय होती. त्यांचे अकाली निधन हे अत्यंत धक्कादायक व दुःखद आहे. त्यांच्या कुटुंबीयांप्रती आणि असंख्य चाहत्यांप्रती मनःपूर्वक शोकसंवेदना. ॐ शांती अशा आशयाची पोस्ट पंतप्रधान मोदी यांनी शेअर केली आहे.

यासह पंतप्रधान मोदी यांनी या अपघातात मृत्यू झालेल्या 5 जणांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी महाराष्ट्रातील बारामती येथे झालेल्या दुर्दैवी विमान अपघातामुळे मी अत्यंत दुःखी आहे. या अपघातात आपल्या प्रियजनांना गमावलेल्या सर्वांच्या दुःखात मी सहभागी आहे. या दुःखाच्या क्षणी शोकाकुल कुटुंबांना शक्ती आणि धैर्य मिळो, ही प्रार्थना करतो. अशी पोस्ट शेअर करत श्रद्धांजली वाहिली.

अजित पवार यांच्या निधनाने सुलभा खोडके भावूक, ढसाढसा रडल्या

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनाच्या बातमीने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (अजित पवार गट) शोककळा पसरली आहे. या दुर्घटनेनंतर अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके या प्रचंड भावूक झाल्या असून प्रतिक्रिया देताना त्या ढसाढसा रडल्या. अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी सुलभा खोडके म्हणाल्या की, “इतक्या मोठ्या नेत्यासोबत देव असे करेल, असे स्वप्नातही वाटले नव्हते. आता काय करायचे आणि काय नाही, हेच कळत नाही. अजित पवार हे आमच्यासाठी फक्त नेते नव्हते, तर कुटुंबातील सदस्य होते. त्यांनी आम्हाला शून्यातून उभे केले. आजही पुढचा मार्ग त्यांच्या शिवाय कसा चालायचा, हे समजत नाही. ते जसे सांगायचे, आम्ही तसेच काम करायचो. काल रात्रीच त्यांच्याशी बोलणे झाले होते. त्यांनी मला भेटायला बोलावले होते. या घटनेला वैयक्तिक नुकसान नसून संपूर्ण महाराष्ट्राचे नुकसान असल्याचे सांगत सुलभा खोडके म्हणाल्या की, अजित पवार यांच्यासारखा नेता पुन्हा होणे अशक्य आहे. हा आमच्या परिवाराचा, पक्षाचा आणि राज्याचा अपूरणीय तोटा आहे.

अंबादास दानवे यांनी वाहिली श्रद्धांजली

अजितदादा… सुमारे चार दशकांच्या कठोर मेहनतीने उभे राहिलेले नेतृत्व एका क्षणात आपल्यातून गेले. शब्दाला जागणारे, प्रशासनावर उत्तम पकड असलेले आणि तळागाळातील लोकांशी घट्ट जोडले गेलेले एक उत्तुंग नेतृत्व आज अजितदादांच्या रूपाने महाराष्ट्राने गमावले आहे. ही हानी पवार कुटुंबियांसह संपूर्ण महाराष्ट्राची आहे. या दुःखद क्षणात आम्ही सर्वजण पवार कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts