Sunetra Pawar: अजित पवारांच्या अचानक निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह राजकारणात मोठे बदल घडताना दिसत आहेत. चला तर अजनू घेऊयात याबाबत अधिक सविस्तर माहिती.
अजित पवारांच्या अचानक निधनानंतर राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षात (Nationalist Congress Party) मोठे राजकीय बदल घडताना दिसत आहेत. पक्षाची धुरा आता पूर्णपणे सुनेत्रा पवार यांच्या हातात गेल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. पक्षातील जेष्ठ नेते प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांचे प्रभावक्षेत्र कमी होत असून, निर्णयप्रक्रिया पवार कुटूंबांचे वर्चस्व वाढल्याचे चित्र समोर येत आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणाला मोठा धक्का
२८ जानेवारी २०२६ रोजी बारामतीजवळ झालेल्या विमान दुर्घटनेत अजित पवारांचे निधन झाले आणि महाराष्ट्राच्या राजकारणाला मोठा धक्का बसला. त्यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेतृत्व कोणाकडे जाणार याबाबत अनेक तर्क- वितर्क सुरू झाले. सुरुवातीला पक्षातील सूत्रे प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या हातात असल्याचे मानले जात होते.
हेही वाचा: SSC CGL ची तयारी करताय? मग ‘हे’ नवीन नियम आधी वाचाच; नाहीतर होऊ शकते मोठे नुकसान
उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली
दरम्यान, ३१ जानेवारी २०२६ रोजी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. कौटूंबिक दुःखातून सावरत त्यांनी राज्यकारभारासोबतच पक्ष संघटनेवरही लक्ष केंद्रीय केले. काही दिवसांतच त्यांनी पक्षातील महत्वाच्या निर्णयांमध्ये स्वतःची पकड मजबूत केल्याचे दिसून आले.
२६ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्याच वेळी पार्थ पवार यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली, ज्यामुळे पक्षातील संसदीय आणि संघटनात्मक नियंत्रण पवार कुटुंबाकडेच राहणार असल्याचे संकेत मिळाले.
सुनेत्रा पवार यांनी विक्रमी मताधिक्याने विजय
प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांना सुरुवातीला महत्त्वाची पदे कायम ठेवण्यात आली होती. मात्र, पुढील काही आठवड्यांत पक्षातील समीकरणे वेगाने बदलली. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांनी विक्रमी मताधिक्याने विजय मिळवत स्वतःची ताकद सिद्ध केली. या निकालानंतर पक्षात त्यांचे राजकीय वजन अधिक वाढले.
यानंतर निवडणूक आयोगाला पाठवण्यात आलेल्या पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीतून प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या पदांचा उल्लेख नसल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली. अधिकृतरीत्या ही “तांत्रिक चूक” असल्याचे सांगण्यात आले, मात्र अनेक राजकीय विश्लेषकांनी याकडे पक्षातील अंतर्गत सत्तासंघर्ष म्हणून पाहिले.
सुनेत्रा पवार
सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील महत्त्वाचे राजकीय आणि संघटनात्मक निर्णय थेट सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्या नेतृत्वाखाली घेतले जात असल्याची चर्चा आहे. यामुळे पक्षातील काही ज्येष्ठ नेत्यांमध्ये नाराजी असल्याचेही बोलले जात आहे.
तथापि, वाढत्या चर्चांदरम्यान सुनेत्रा पवार यांनी नाराज नेत्यांशी संवाद साधण्यास सुरुवात केली आहे. पक्षात कोणताही मतभेद नसल्याचे सांगत पार्थ पवार आणि सुनील तटकरे यांनीही माध्यमांसमोर सावध भूमिका घेतली आहे.
अजित पवारांच्या निधनानंतर अवघ्या काही महिन्यांत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेतृत्वाचे नवे केंद्र निर्माण झाले आहे. मात्र, पक्षातील हा अंतर्गत संघर्ष पुढे शांत होणार की आगामी निवडणुकांमध्ये आणखी मोठे परिणाम दिसणार, याकडे आता महाराष्ट्राच्या राजकारणाचे लक्ष लागले आहे.












