Breaking News :
  • Home
  • राजकारण
  • ‘नाशिक दत्तक घेतलं.. नंतर बार इकडे फिरलाच नाही;’ राज यांची फडणवीसांवर ‘ठाकरे तोफ’
Top News

‘नाशिक दत्तक घेतलं.. नंतर बार इकडे फिरलाच नाही;’ राज यांची फडणवीसांवर ‘ठाकरे तोफ’

Raj Thackeray attack on Devendra Fadnavis

Raj Thackeray on Devendra Fadnavis  : राज्यातील महापालिकांच्या निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला आहे. सर्वच नेते पायाला भिंगरी लावून प्रचार करत आहेत. ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची आज नाशिकमध्ये संयुक्त प्रचारसभा पार पडत आहे. आजच्या सभेत बोलताना मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ठाकरे तोफ डागली आहे. नाशिक दत्तक घेतो म्हणाले. नंतर बाप फिरकलाच नाही असा हल्लाबोल राज यांनी फडणवीसांवर केला आहे.

हेही वाचा – अंबरनाथमध्ये मोठी उलथापालथ! श्रीकांत शिंदेंचा रवींद्र चव्हाण यांना धोबीपछाड

स्वत:ची पोरं जन्माला घालता आले नाहीत – राज ठाकरे

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपमध्ये जोरदार इनकमिंग झाले. यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले की, नाशिकमध्येही भाजप तुमच्याकडे माणसं होती का? 1952 साली जन्माला आलेला एक पक्ष जनसंघ नावाने स्थापन झाला. मात्र, 2026 पर्यंत यांना स्वत:ची पोरं जन्माला घालता आले नाहीत. दुसर्‍यांची पोरं भाड्याने घ्यावे लागतात. तुमची माणसं उभी केली होती ना. मग दुसऱ्यांची कशाला कडेवर घेऊन नाचत आहात. येणारे आनंदाने येत नाही. रात्री पैसे पोहोचवले जातात, असे ते म्हणतात.

दत्तक घेतो म्हटल्यावर बाप परत फिरकलाच नाही

‘तपोवनातील झाडं महाजनांना हटवायचे आहेत. अहो लाकूडतोड्या बरा होता. कुऱ्हाड गेली देवीने विचारलं सोन्याची तर नाही. चांदीची तर नाही. ओरिजनल दिली. सोन्या चांदीच्या कुऱ्हाडीलाही लाकूडतोड्या भाळला नाही. यांना झाडं छाटायची आहे. स्वत:च्या पक्षातील कार्यकर्ते छाटली. बाहेरून झाडं मागवली आणि ती पक्षात लावत आहेत. 2012 साली इथे सत्ता आली. 2017 साली इथे फडणवीस आले. म्हणाले, नाशिक मी दत्तक घेतो. त्या सर्व गोष्टींना नाशिककर भुलले. आम्ही जी कामे केली होती ते विसरले. दत्तक घेतो म्हटल्यावर बाप परत फिरकलाच नाही. काय काय करतो म्हणून सांगितलं होतं, असा टोला मुख्यमंत्री फडणवीसांना लगावला आहे.

रतन टाटांना आम्ही नाशिकमध्ये आणलं

‘आमची सत्ता असताना कुंभमेळा झाला. उत्तम पार पडला. एकही झाड कापलं नाही. रतन टाटांना आम्ही नाशिकमध्ये आणलं. पहिल्या पाच वर्षात आम्ही धरणातून पाईपलाईन आणली. नाशिकच्या पाण्याचा प्रश्न सोडवून टाकला. जीपीएस लावलेल्या घंटा गाड्या सुरू केल्या. घनकचरा प्रकल्प सुरू केला. विटा खत शेतकरी घेऊन जात आहेत. तिथे वासही येत नाही. वाहतूक बेटांचं सुशोभिकरण केलं. बोटॅनिकल गार्डन केलं. मी रतन टाटांकडे प्रकल्प घेऊन गेलो. ते म्हणाले किती खर्च आहे. मी म्हटलं पाच कोटी. ते म्हणाले डन आणि त्यांनी त्यांचे माणसं कामाला लावली. त्यांचीच माणसं प्रकल्प केली. तो प्रकल्प झाला तेव्हा रतन टाटांनी 15 कोटी खर्च केले होते. या गार्डनची गेल्या पाच वर्षात वाट लावली आहे असाही आरोप राज ठाकरेंनी केला आहे.

कुणाच्या सोंगट्या कुणाच्या भोकात आहे हेच कळत नाही – राज

आज अनेक वर्ष निवडणुका रखडल्या, का रखडल्या? याची कारणं कुणालाही देता येणार नाही, सांगता येणार नाही, कारणं कळलीच नाही. इतकी वर्ष निवडणुकीला का लागले? कशासाठी लागले? चार वर्षांपूर्वी मुदत संपल्यावरही निवडणुका होत नव्हत्या. का होत नव्हत्या याचं उत्तर सरकारने दिलं पाहिजे. सध्या महाराष्ट्रात गोंधळ सुरू आहे. कोण कुठं चाललंय कोण काय चाललंय मागे एकदा म्हटलं होतं ना, इतका चुकीचा कॅरम फुटलाय ना कुणाच्या सोंगट्या कुणाच्या भोकात आहे हेच कळत नाही. प्रत्येकाला विचारावं लागतं आज कुठे? काही जण वेडेपिसे झाले, त्या दिवशी कळलं एकाने छाननीच्या वेळी समोरच्याचा एबीफॉर्म घेतला आणि गिळला, असा हल्लाबोल यावेळी राज ठाकरे यांनी केला आहे.

वेळ नव्हता, दिवस नव्हता, एखादा दिवस असता तर सकाळी तरी एबी फॉर्म बाहेर पडला असता. तीही वेळ दिली नाही. कोणत्या थराला गेल्या आहेत निवडणुका? बिनविरोध निवडून येतात, तिकडच्या लोकांना मतदानाचा अधिकारही त्यांना देणार नाही का? काहीवेळा दहशतीतून, काही वेळा पैसे देऊन, आकडे ऐकतोय कुणाला एक कोटी, कुणाला पाच कोटी, कल्याण डोंबिवलीत प्रभागात एका घरातील तिघे उभे आहेत, त्यांना काय ऑफर झाली असेल? एका प्रभागातील तिन जणांना १५ कोटी रुपयांची ऑफर झाली. कुणाला पाच कोटी, कुणाला दोन कोटी, येतात कुठून एवढे पैसे? असा सवाल यावेळी राज ठाकरे यांनी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts