Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • “मराठी माणसाच्या सहीनं डेथ वारंट निघालंय;” राज ठाकरे कडाडले
Top News

“मराठी माणसाच्या सहीनं डेथ वारंट निघालंय;” राज ठाकरे कडाडले

Raj Thackeray and Uddhav Thackeray joint interview

Raj Thackeray Death Warrant Statement : सध्या राज्यातील २९ महापालिका निवडणुकींची रणधुमाळी सुरू आहे. सर्वच राजकीय पक्षांचे नेते प्रचारात व्यस्त आहेत. मुंबई महापालिकेची निवडणूक तर अतिशय प्रतिष्ठेची बनली असून मुंबईचा महापौर कोण होणार, मराठी माणूस की अजून कोणी याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे. त्यासाठी 15 जानेवारीला राज्यातील 29 महापालिकांसाठी मतदान पार पडणार आहे, तर शुक्रवार 16 जानेवारीला मजमोजणी होऊन निकाल जाहीर होतील. त्या पार्श्वभूमीवर मतदानासाठी प्रचार सभा, फेऱ्या, मुलाखती, यांचा सपाटा सुरू असून 20 वर्षांनी एकत्र आलेल्या ठाकरे बंधुंची संयुक्त मुलाखतीचा एक भाग नुकताच प्रसिद्ध झाला आहे. राठी माणसाच्या सहीनं मराठी माणसाचं डेथ वाॅरंट काढलं जातंय,’ असं त्यांना विचारण्यात आलेल्या एका प्रश्नावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे कडाडल्याचे पाहायला मिळाले .

हेही वाचा – राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संयुक्त मुलाखतीचा टीझर प्रदर्शित

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची संयुक्त मुलाखत घेण्यात आली. शिवसेना खासदार संजय राऊत आणि जेष्ठ दिग्दर्शक आणि अभिनेते महेश मांजरेकर या दोघांनी विविध विषयांवर त्यांची मतं जाणून घेतली. या मुलाखतीचा टीझर रिलीज झाल्यावर तो सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता. आता त्याच मुलाखातची पहिला भाग समोर आला असून राज व उद्धव यांनी मुंबई, त्याबद्दलचं व्हिजन, भाजप, महायुती सरकार, भ्रष्टाचार, मुंबईतील परप्रांतीयांचे लोंढे अशा विविध मुद्यांवर मनमोकळेपणे मत मांडली. संजय राऊत व मांजरेकरांनी विचारलेल्या काही प्रश्नांची सडेतोड उत्तरही या दोघांनी दिली.

 फडणवीस तर नागपूरचे आहेत

मराठी माणसाच्या सहीनं मराठी माणसाचं डेथ वॉरंट काढलं जातंय ! असं म्हणत राज ठाकरेंनी राऊतांच्या म्हणण्याला सहमती दर्शवली. आपण मुंबईतले आहोत, इथे जन्म घेतला वाढलो, आपण सगळे मुंबईकर आहोत. पण इथे बाकीचे सगळे आहेत ना, अगदी देवेंद्र फडणीवस हे देखील, ते बाहेरचे आहेत. फडणवीस तर नागपूरचे आहेत. ठाकरे यांनी ‘मूळ मुंबईकर’ ही संकल्पना मांडत फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडलं.

ही माणसं बसलेली नाहीत, बसवलेली माणसं आहेत

यावेळी मुंबईच्या मुद्यावर बोलताना संजय राऊत यांनी विविध प्रश्न विचारले. महाराष्ट्रात मराठी माणसाचं डेथ वॉरंट निघतंय, असं राऊतांनी म्हणतात, त्यावर राज आणि उद्धव या दोघांनी दुजोरा दिला. ही माणसं जी आहेत ना, ती बसलेली नाहीत, बसवलेली माणसं आहेत. त्यामुळे ते फक्त जागा पाहतात. त्यांच्याकडे सहीसाठी फायली येतात आणि त्यांना सही करायला सांगितली जाते. आपण काय करतोय, काय घोडचुका केल्या आहेत. ते इथल्या लोकांना, मराठी माणसांना अजून समजत नाहीये, पण आणखी काही काळाने त्यांना समजेल की काय चूक झाली आहे, ते असं राज ठाकरे म्हणालेय.

मुंबईकरांना काय पाहिजे, हे इथे जन्माला आल्याशिवाय कळणार नाही

देवेंद्र फडणवीस नागपूरचे. बाकीचेही सगळे बाहेरचे असं म्हणत राज ठाकरे यांनी उदाहरण दिलं. ते म्हणाले, मी एकदा स्वीत्झर्लंडला गेलो होतो. तिथे मी तो देश पाहिला. गाड्या इकडे तिकडे फिरत होत्या, सर्व चांगलं होतं, सर्वांना चांगल्या नोकऱ्या, रस्तेही मस्त. निसर्गही छान तिकडचा. अगदी सगळं छान. ते पाहून माझ्या मनात एक प्रश्न निर्माण झाला की इथे जेव्हा निवडणुका येत असतील तेव्हा इथला विरोधी पक्ष काय करत असेल? मी तुम्हाल हे देईन, ते देऊन, असं ते काय सांगत असतील ? असा सवाल राज यांनी विचारला. मुंबईत मुंबईकरांना काय पाहिजे, हे मला असं वाटतं की तुम्हाला तिथं जन्माला आल्याशिवाय कळणार नाही. जेव्हा तुम्ही बाहेरून येऊन एखादा देश, जागा बघता, तेव्हा तिथले प्रश्न का. आहेत, समस्या कोणत्या हे तुम्हाला समजणारच नाही असं राज यांनी सुनावलं.

img

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts