SC Final Hearing : महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी कायदेशीर लढाई पुन्हा एकदा तारखांच्या गोंधळात अडकली आहे. शिवसेनेचं नाव आणि “धनुष्यबाण” चिन्हावरील सर्वोच्च न्यायालयात होणारी सुनावणी आता 23 जानेवारीपर्यंत पुढं ढकलण्यात आली आहे, म्हणजेच बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीदिनी होणार आहे. ज्यामुळं उद्धव ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचं नाव आणि त्यांचे अधिकृत निवडणूक चिन्ह, “धनुष्यबाण” यावरुन महाराष्ट्रात सुरु असलेला कायदेशीर लढाई पुन्हा एकदा तीव्र झाली आहे. 21 जानेवारी रोजी होणारी सर्वोच्च न्यायालयात होणारी महत्त्वाची आणि अंतिम सुनावणी आता 23 जानेवारीला होणार आहे.
राजकारणात ठरणार ऐतिहासिक दिवस :
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे आणि सध्या सुरु असलेली सुनावणी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. त्याचप्रमाणे, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांनी त्यांचे काका शरद पवार यांच्याविरुद्ध बंड केलं आहे आणि पक्षाचं नाव आणि निवडणूक चिन्ह, घड्याळ हे ताब्यात घेतलं आहे. शरद पवार गटानंही सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे, जी आता निर्णयाच्या प्रतीक्षेत आहे. अशाप्रकारे, शुक्रवार हा महाराष्ट्राच्या राजकारणात एक ऐतिहासिक दिवस ठरण्याची शक्यता आहे.
बीएमसी महापौरपदासाठी संघर्ष सुरु :
शिवसेनेतील ही महत्त्वाची सुनावणी अशा वेळी होत आहे जेव्हा मुंबईतील बीएमसी महापौरपदासाठी भाजपा-शिंदे गटात संघर्ष सुरु आहे. तज्ज्ञांचं म्हणणं आहे की या निर्णयाचा महापौरपदाच्या निवडणुकीवर मोठा परिणाम होईल. जर निर्णय शिंदे गटाच्या बाजूनं झाला तर एकनाथ शिंदे जोरदारपणे परत येतील, परंतु जर परिस्थिती उलटली तर एकनाथ राजकीयदृष्ट्या अनाथ होऊ शकतात.
उद्धव ठाकरेंच्या बाजूनं निर्णय झाला तर :
साठी जोरदार युक्तिवाद करतील. दुसरीकडे, प्रसिद्ध वकील कपिल सिब्बल उद्धव गटासाठी जोरदारपणे आपली बातज्ज्ञांचं म्हणणं आहे की जर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय उद्धव ठाकरेंच्या बाजूनं झाला आणि त्यांना शिवसेना पक्षाचं नाव आणि निवडणूक चिन्ह, धनुष्यबाण पुन्हा मिळालं तर हा शिंदे गटासाठी मोठा धक्का असेल. सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीदरम्यान, शिंदे गटाचे वकील पक्षाचं नाव आणि निवडणूक चिन्ह कायम ठेवण्याजू मांडतील अशी अपेक्षा आहे.
न्यायालयाच्या निर्णयावर देशाचं लक्ष :
अशा परिस्थितीत, महाराष्ट्रासह संपूर्ण देश गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर बारकाईनं लक्ष ठेवेल. सर्वोच्च न्यायालयात राष्ट्रवादी काँग्रेसवरील आगामी सुनावणीमुळं शरद पवार गटातही अशांतता निर्माण होत आहे. मात्र, महापालिका निवडणुकीदरम्यान काका-पुतण्यांमध्ये अलिकडेच झालेली जवळीक पाहता, ठाकरे आणि शिंदे यांच्यात होती तशी पवार गटात कटुता नाही.












