Sunetra Ajit Pawar first woman Deputy CM : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांचे बुधवारी विमान अपघातात निधन झाले. त्यांच्या निधनानंतर राजकीय वर्तुळात अनेक घडामोडींचा वेग आला. गुरुवारी त्यांच्या अंत्यविधीनंतर उपमुख्यमंत्री पदाचा कार्यभार कोण सांभाळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. त्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनाच उपमुख्यमंत्री बनवण्याच्या चर्चांना उधाण आले. त्यानंतर आज अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.
आज होणार उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी
आज सायंकाळी 5 वाजता अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहे. त्या शपथविधीनंतर महाराष्ट्रातील पहिल्या महिला उपमुख्यमंत्री बनतील. सुनेत्रा अजित पवार या महाराष्ट्रातील एक प्रभावशाली सामाजिक कार्यकर्त्या राजकारणी आणि राज्यसभेच्या खासदार आहे. खासकरून त्या आपल्या समाजकार्य, पर्यावरणीय उपक्रम आणि ग्रामीण विकासासाठी ओळखल्या जातात. आता आजपासून त्यांना एक नवीन ओळख मिळेल.
कुटुंब आणि शिक्षण
सुनेत्रा पवार यांचा जन्म 1963 मध्ये एका महाराष्ट्रातील राजकीय तथा कृषी कुटुंबात झाला. त्यांचे वडील बाजीराव पाटील राजकारणी होते. याशिवाय त्यांचे भाऊ पादमसिंह पाटील हे 1980 च्या दशकात उस्मानाबाद जिल्ह्यातुन राजकारणात कार्यरत होते. सुनेत्रा पवार यांनी कॉमर्समध्ये Bcom पदवी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांचा 1985 मध्ये अजित पवार यांच्यासोबत विवाह झाला. त्यानंतर त्यांना 2 पुत्र झाले. त्यांचे नाव पार्थ आणि जय.
सामाजिक कार्यातून मिळवली प्रसिद्धी
त्यांनी सामाजिक कार्यातून प्रसिद्धी मिळवली. 2010 मध्ये त्यांनी Environmental Forum of India (EFOI) या स्वयंसेवी संस्थेची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धन, जैविक शेती, इको विलेज आणि शाश्वत विकासासाठी कार्य केले जाते. सुनेत्रा पवार यांनी nirmal gram abhiyan या मोहिमेत महत्वपूर्ण भूमिका बजावली. तसेच मॉडेल पर्यावरण विकास गाव बनवण्यात त्यांनी सहकार्य केले. याशिवाय त्यांनी विद्या प्रतिष्ठान शिक्षण संस्थेच्या विश्वस्त परिषद म्हणून देखील काम केले आहे.
राज्यसभेत महाराष्ट्रातून खासदार म्हणून नियुक्त
सुनेत्रा पवार यांनी 2024 यावर्षी लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून प्रचार केला. त्यानंतर राज्यसभेत महाराष्ट्रातून खासदार म्हणून त्यांना नियुक्त करण्यात आले. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी विविध सामाजिक शैक्षणिक पर्यावरणीय मुद्यांवर संसदेत सहभाग नोंदवला. त्यांनी राजकारणात फारच उशिरा प्रवेश केला. आता त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून आज 5 वाजता शपथविधी घेणार आहे. आणि महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात प्रवेश करणार आहे.
महाराष्ट्रातील आदरणीय नेतृत्व म्हणून खास ओळख
सुनेत्रा पवार या सौम्य, समजूतदार आहे. त्यांना सामाजिक कार्य, विद्यार्थ्यांच्या शिसखानासाठी समर्पण ग्रामीण विकासात सक्रिय सहभाग यासर्वांमुळे त्याची महाराष्ट्रातील आदरणीय नेतृत्व म्हणून खास ओळख आहे. त्यांचा राजकारणातील उपमुख्यमंत्री म्हणून होणारा प्रवेश सर्वांसाठी आशादायी प्रेरणादायी ठरेल अशी आशा आहे.












