• Home
  • राजकारण
  • सुप्रिया सुळे यांच्या गाडीचा ‘एक्सप्रेस वे’वर अपघात; स्वतः दिली माहिती
Top News

सुप्रिया सुळे यांच्या गाडीचा ‘एक्सप्रेस वे’वर अपघात; स्वतः दिली माहिती

Supriya Sule Car Accident

Supriya Sule Car Accident : पुणे-मुंबई एक्सप्रेस वे (Pune-Mumbai Expressway) गेल्या काही दिवसांपासून अनेक कारणांनी चर्चेच्या केंद्रस्थानी येत आहे. कधी वाहतूक कोंडी तर कधी अपघातने या वे चर्चेत असताना आता आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांच्या गाडीला या महामार्गावर अपघात (Accident on the Highway) झाल्याची बातमी समोर आली आहे. या अपघाताची माहिती स्वतः सुळे यांनी दिली आहे. ज्या वाहनाने त्यांच्या वाहनाला धडक दिली त्या वाहनाचा नंबर प्लेटही सुप्रिया सुळेंनी शेअर केला आहे.

“आज पुणे ते मुंबई प्रवास करत असताना, महामार्गावर जीजे-१३ सीएफ-५२५७ या वाहनाने बेदरकारपणे गाडी चालवल्यामुळे माझ्या गाडीला बाजूने धडक दिली,” अशी माहिती सुप्रिया सुळे यांनी एक्स या सोशल मिडीया अकाउंटवर शेअर करत दिलीय. या महामार्गावर मागील काही दिवसांपासून अनेक घडताना समोर येत आहे. आता या अपघातने महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. राज्यातील लोकप्रतिनिधीच सुरक्षित नसतील तर सामान्य जनतेचं काय? असा प्रश्न आहे.

हेही वाचा – निदा खानला आसरा देणाऱ्या, मतीनचा अश्लील व्हिडीओ समोर

सुदैवाने सर्वजन सुरक्षित – सुप्रिया सुळे

“हा एक अत्यंत वाईट अनुभव होता. सुदैवाने, सर्वजण सुरक्षित आहेत. अशा घटना हा एक गंभीर इशारा आहे की, आपल्या रस्त्यांवरील अतिवेग आणि निष्काळजीपणामुळे असंख्य लोकांचे जीव धोक्यात येऊ शकतात. मी सर्वांना आवाहन करते की, सीट बेल्ट लावा, सतर्क राहा आणि जबाबदारीने वाहन चालवा, जेणेकरून आपले महामार्ग सर्वांसाठी अधिक सुरक्षित राहतील,” असं त्यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

काही दिवसांपूर्वी खासदार हेमंत देवरा यांच्या गाडीला अपघात

१ मे रोजी मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील घोडबंदर जवळच्या रस्त्यावर पालघरचे खासदार डॉ. हेमंत विष्णू सवरा यांच्या गाडीचा अपघात झाला होका. खासदार यांची गाडी विरुद्ध दिशेने जात असताना समोरून येणाऱ्या हायवा ट्रकची धडक बसल्याने हा अपघात घडला. ही घटना शुक्रवारी सकाळच्या सुमारास घडली असून खासदार सावरा व त्यांच्यासोबत असलेले सहकारी हे सुखरूप आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts