Resignation of a Shiv Sena (Thackeray) leader : राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकीची घोषणा घोषणा झाली. त्यानंतर राजकीय राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्व महापालिकांच्या निवडणूकीसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे तर १६ जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. सर्व पक्षाचे नेते सुरक्षित गेम खेळत आहेत. आपण कोणत्या पक्षात असल्यास सहज निवडून येऊ आणि मोठ्या पदावर जाऊ याचे गणित जुळवले जात आहेत. त्या अनुषंगाने राज्यात सर्वत्र पक्षांतराने वारे वाहू लागले आहेत. त्यातचं आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष ज्या शिलेदाराच्या नेवृत्त्वाखाली निवडणूक लढवू पाहात होती, त्यानेच ठाकरेंची साथ सोडल्याचे समोर आले आहे.
निवडणुका जाहीर झाल्या तेव्हापासून भाजपात जोरदार पक्षप्रवेश सुरू झाले आहेत. असे असताना ठाकरे सेनेला सर्वात मोठा धक्का भाजपने आता दिला आहे. ठाकरे गटाच्या मोठ्या नेत्याने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर आता हा नेता भाजपात प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर हा ठाकरेंसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
संजोग वाघेरे यांनी शहराध्यक्षपदाचा राजीनामा
मिळालेल्या माहितीनुसार ठाकरे यांच्या पक्षाला पिंपरी चिंचवडमध्ये मोठा धक्का बसला आहे. येथील शिवसेना ठाकरे गटाचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. ते लवकरच भाजपात प्रवेश करणार असल्याचे म्हटले जात आहे. ऐन महापालिकेच्या निवडणुकीत वाघेरे यांनी हा निर्णय घेतला आहे. वाघेरे यांना भाजपात मोठी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहेत.
शहराचा शिलेदारच सोडून गेल्याने ठाकरेंची पंचाईत
दुसरीकडे पिंपरी चिंचवड येथील पालिका निवडणूक जिंकण्यासाठी ठाकरे गटाने रणनीती आखायला सुरुवात केली आहे. असे असतानाच या शहराचा शिलेदारच सोडून गेल्याने ठाकरेंची पंचाईत झाली आहे. वाघेरे यांच्यासोबत अनेक कार्यकर्ते काही पदाधिकारीदेखील भाजपात प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता येथे निवडणूक लढवायची असेल तर वाघेरे यांच्याच तोडीचा नेते आता ठाकरे यांना शोधावा लागणार आहे. त्यामुळे आता नेमके काय होणार? पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
भाजप-अजित पवार गट स्वतंत्र लढणार
दुसरीकडे पिंपरी चिंचवड येथे अजित पवार यांची राष्ट्रवादी तसेच भाजपा यांची मोठी ताकद आहे. त्यामुळे येथे हे दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार आहेत. महायुतीच्या रुपात या दोन्ही पक्षांची युती असली तरी पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन महापालिकांसाठी राष्ट्रवादी आणि भाजप स्वतंत्र लढणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे या दोन महापालिकेत कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.












