Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • दोन माजी महापौर शिंदे सेनेच्या गळाला, एकनाथ शिंदेच्या हस्ते पक्षप्रवेश
Top News

दोन माजी महापौर शिंदे सेनेच्या गळाला, एकनाथ शिंदेच्या हस्ते पक्षप्रवेश

Two former mayors join Shinde Sena

Two former mayors join Shinde Sena : राज्यात सध्या महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. बडे नेते पायाला भिंगरी लावून प्रचार करत आहेत. शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे हे ही दररोज वेगवेगळ्या ठिकाणी जात सभा घेत आहेत. राज्यातील जास्तीत जास्त महापालिकेत महापौर बसवण्यासाठी प्रत्येक पक्ष प्रयत्न करत आहे. महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी नाराज उमेदवारांनी मोठ्या प्रमाणात पक्षांतर केले होते. मात्र आता प्रचार सुरु असतानाही पक्षांतराला वेग आला आहे. नाशिकच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. दोन माजी महापौर एकनाथ शिंदेंच्या गळाला लागले आहेत. त्यामुळे शिवसेनेची ताकद वाढली आहे.

ऐन निवडणुकीत नाशिकमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी पहायला मिळत आहेत. माजी महापौर अशोक मुर्तडक व माजी महापौर दशरथ पाटील आज शिवसेनेत प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी हा पक्षप्रवेश पार पडला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दोघांचे पक्षात स्वागत केले आणि त्यांना भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.  

 शिंदेच्या सेनेत दोन माजी महापौरांचा प्रवेश

मनसेची सत्ता असताना अशोक मुर्तडक हे महापौर होते. मात्र काही काळापूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. तर दशरथ पाटील हे शिवसेना फुटण्यापूर्वी महापौर होते. त्यांनीही काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता. अशोक मुर्तडक यांनी प्रभाग क्रमांक 6 मधून भाजपकडे उमेदवारी मागितली होती. मात्र उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांनी अपक्ष अर्ज दाखल केलेला आहे. त्यानंतर आता त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे नाशिकची निवडणूक वेगळ्या वळणावर येवून टेकली.

या प्रवेशामुळे शिंदे गटाची ताकद वाढली  

प्रेम पाटील शिवसेनेचे उमेदवार माजी महापौर दशरथ पाटील यांचा मुलगा प्रेम पाटील हे आधापासून शिवसेनेत आहेत. शिवसेनेने त्यांना प्रभाग क्रमांक 9 मधून उमेदवारी दिलेली आहे. प्रेम पाटील हे शिवसेनेत असल्यामुळे दशरथ पाटील हेही शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. आज अखेर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. आता या दोन्ही बड्या नेत्यांच्या शिवसेना प्रवेशामुळे पक्षाची ताकद वाढली आहे.

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts